शिक्षण

नांदेड विद्यापीठातील वस्तीगृह तात्काळ सुरू करा – एसएफआयचे कुलगुरू निवासस्थाना समोर आंदोलन

नांदेड(प्रतिनिधी)- स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या वतीने दि १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील वस्तीगृह सुरू करावेत यासह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या घेऊन कुलगुरू निवासस्थानासमोर आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाने आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांना अडवले त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू निवासस्थानापासून जोरदार घोषणा देत प्रशासकीय इमारती समोर जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
ग्रामीण व शहरी भागातील शाळा , महाविद्यालये ऑफलाई पद्धीने वर्ग भरण्यास सुरूवात झाले मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आजूनही ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे. ग्रामीण भागात इंटरेनट सेवा व इतर सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शहरात रूम करून राहवे लागते मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शहरात भाड्याने रूम करून राहणे परवडत नसल्याने विद्यापीठातील वस्तीगृह सुरू करून विद्यार्थ्यांना वस्तीगृहात राहण्याची प्रवानगी देऊन ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तासिका घ्यावेत अशी मागणी एसएफआय  विद्यार्थी संघटनेने केली.तब्बल दोन तास विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्यानंतर कुलसचिवानी विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलवले त्यावेळी विद्यापीठ स्तरावरील मागण्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन कुलसचिवानी
दिले तर वस्तीगृह उघडण्यासाठी संबधीत  विभागाकडे पत्र पाठवणार असल्याचे सांगितले या सविस्तर चर्चे नंतर हे आंदोलन तात्पुर्त्या स्वरूपात मागे घेण्यात आले.
लवकरात लवकर वस्तीगृह न उघडल्यास येणाऱ्या दिवसात कुलगरू निवासस्थाना समोर मुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा एसएफआय संघटनेने दिले.या आंदोलनात काॅ विशाल भद्रे , काॅम्रेड पवन जगडमवार , श्रावण वाहूळकर , अंकाक्षा पिंगनाळे ,चंनचल पाटील , दिनेश येरेकर ,युवराज मानाली , बालाजी गायकवाड यांच्यासह अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *