

महिलांचे आरोग्य आणि स्वयंरोजगार हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट – किरण चौधरी.
नांदेड,(प्रतिनिधी) – शुभंकरोती फाऊंडेशन व देसाई फाऊंडेशन व एस.बी.आय यांच्या संयुक्त विद्यमाने लोहा तालुक्यातील मधली बेटसांगवी येथे गावातील महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले, यावेळी संस्थेतर्फे महिलांच्या स्वयंरोगारासाठी चालू असलेल्या प्रशिक्षण शिबिराची माहिती देण्यात आली.
महिलांनी आपले आयुष्य केवळ चुल व मुल यातच वाया न घालविता घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावे त्याचबरोबर स्वत: व्यवसाय सुरू करून आपल्या कुटूंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने संपूर्ण देशाचा विकास व प्रगती कशी साधता येईल, याबाबत शिबिरार्थ्यांना माहिती देण्यात आगावपातळीवर ज्या वस्तूंच्या गरजा आहेत त्या सर्व गोष्टी गावातील महिलांकडून तयार झाल्या पाहिजेत म्हणजेच गावातील लोक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील तसेच गावातील महिलांना काम मिळालं पाहिजे व त्यांचे आरोग्य सुधारले पाहिजे त्याचबरोबर गावातील किशोरवयीन मुलींचे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच्यावर एकत्रितरित्या काम केले पाहिजे, आसे
शुभंकरोती फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट असून गावातील सर्व महिला व मुलीनी या कार्यासाठी साथ दिली पाहिजे असे मत फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी व्यक्त केले.गावपातळीवर ज्या वस्तूंच्या गरजा आहेत त्या सर्व गोष्टी गावातील महिलांकडून तयार झाल्या पाहिजेत म्हणजेच गावातील लोक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. यानंतर महिलांच्या आरोग्य विषयी फाऊंडेशनच्या महीला समन्वयकांनी मार्गदर्शन केले.बेटसांगवी गावातील सर्व महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण तसेच संगणक प्रशिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचे आश्वासन सुद्धा संस्थेमार्फत देण्यात आले असून त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले.
यावेळी शुभंकरोती फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी,महीला समन्वयक स्वप्नजा गोरे, समन्वयक अभिजीत बारडकर ,गौरव वाळिंबे तसेच गावातील महिला व मुलींची उपस्थिती होती