नांदेड

४०-४५ वर्षांचा अनोळखी माणसाचे प्रेत सापडले आहे;वजिराबाद पोलिसांनी शोध पत्रिका जारी केली

नांदेड,(प्रतिनिधी)- आज १५ डिसेंबर रोजी मुरमुरा गल्लीत एक अनोळखी पुरुष ४०-४५ वर्षांचा मयत अवस्थेत सापडला आहे.वजिराबाद पोलिसांनी त्याच्या नातलगांची ओळख पटवण्यासाठी शोध पत्रिका जारी केली आहे.
                            आज दिनांक १५ डिसेंबर रोजी मुरमुरा गल्लीतील श्रीकांत बालाजी कोतावार यांनी पोलीस ठाणे वजिराबाद येथे खबर दिली की,केदारनाथ ट्रँडींग कंपनीच्या ओट्यावर एक ४०-४५ वर्षीय माणूस मरण पावलेला आहे.वजिराबाद पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यू क्रमांक ६५/२०२१ दाखल केला, या बाबतचा तपास पोलीस अंमलदार प्रकाश राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे.
                            मरण पावलेला व्यक्ती अंदाजे ४०-४५ वर्षांचा असेल.रंग सावळा आहे.चेहरा लांबट आहे.उंची १६६ सेंटीमीटर आहे.बांधा सडपातळ आहे.केस काळे पांढरे आहेत.नाक सरळ आहे.अनोळखी मयताच्या काळ्या रंगाचा पॅण्ट आणि मळकट बदामी रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे.अश्या वर्णनाच्या माणसास कोणी ओळखत असेल तर त्यांनी त्या बाबत वजिराबाद पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.माहिती देणाऱ्यांनी वजिराबादचा दूरध्वनी क्रमांक ०२४६२ २३६५०० आणि पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांचा मोबाईल क्रमांक ९९२३६९६८६० आणि पोलीस अमंलदार प्रकाश राठोड यांचा मोबाईल क्रमांक ९८३४५५२९५७ यावर सुद्धा जनतेला माहिती देता येईल.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *