नांदेड

पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली ऊर्जा बचतीची शपथ

नांदेड(प्रतिनिधी)-आज राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिनानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या पाठीमागे ऊर्जा बचत करण्याची शपथ अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी घेतली.
14 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन आहे. आज या निमित्ताने पोलीस अधिक्षक कार्यालयात प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपल्या सहकारी, अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना ऊर्जा बचतीची शपथ दिली त्यात कार्यालयात ज्या-ज्या ठिकाणी वीज विनाकारण सुरू दिसली तर ते विज दिवे मी बंद करील. मी विद्युत उपकरणांचा आवश्यक तेंव्हाच वापर करील. वीजेची ट्युबलाईट, पंख्ये इत्यादी उपक्रमे आवश्यकता नसेल तेंव्हा बंद करेल. मी माझ्या घरात, परिसरात वीज बचतीसाठी नेहमी प्रयत्नशिल राहिल. मी घरात पाणी तापविण्यासाठी हिटर, विद्युत शेगडी ऐवजी सौरउर्जेवरील उपकरणांचा वापर करील. मी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करेल.ज्यामुळे इंधन बचत होईल. मी विद्युत उपक्रमांची वारंवार देखभाल करेल. मी पारंपारिक ऊर्जा उपकरणांचा जास्तीत जास्त वापर करण्याकरीता प्रयत्न करेल. मी कार्यक्षम विद्युत उपकरणांचा वापरेल करेल. सीएलएफ, स्टारलेबल, रेफ्रीजरेटर अशा प्रकारे वीज बचतीसाठी राष्ट्रीय अभियान यशस्वी करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. या प्रतिज्ञेला प्रथम पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे वाचत होते. त्यांच्या पाठोपाठ उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी प्रतिसाद दिला.
या प्रसंगी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पाडूरंग भारती तसेच नियंत्रण कक्ष व इतर शाखांमधील अनेक पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार आणि कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *