नांदेड(प्रतिनिधी)-एसबीआय बॅंकेत नोकरी लावतो म्हणून त्याचे 15 लाख रुपये नोकरी पण नाही आणि 15 लाख मधील फक्त 6 लाख परत देवून 9 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी किनवट पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
किनवटमध्ये राहणारे नंदकिशोर धनाजी बसवंते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जानेवारी 2018 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान त्यांना राजेश आनंदराव शेळके रा.बांगरनगर हिंगोली यांनी एसबीआय बॅंकेमध्ये नोकरी लावतो म्हणून त्यांना एसबीआय बॅंकेचा बनावट आदेश दिला. त्यासाठी 15 लाख रुपये घेतले. पुढे कांही दिवसांनी पुढे कांही दिवसांनी तुमचे काम झाले नाही म्हणून फक्त 6 लाख रुपये परत दिले. उर्वरीत 9 लाख रुपये आजपर्यंत परत दिले नाहीत. या फसवणूकीसाठी किनवट पोलीसांनी राजेश आनंदराव शेळकेविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471 नुसार गुन्हा क्रमांक 376/2021 हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.
