क्राईम

माहूर येथे तीन लाखाची चोरी; मालेगाव रस्त्यावर दोन लाखांची बॅग पळवली

नांदेड(प्रतिनिधी)-माहूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 13 हजार 850 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. शहरातील मालेगाव रस्त्यावर दोन लहान मुलांनी मिळून 2 लाख रुपयांची बॅग घेवून पळून गेले आहेत. नांदेड ग्रामीण आणि कुटूंर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. विनायकनगर नांदेड येथून चार लाल कंधारी गायी चोरून नेल्या आहेत.
अमोल आबासाहेब सराफ यांचे घर श्रध्दा लेआऊट माहूर येथे आहे. दि.8 डिसेंबर रोजी ते आपल्या घराला कुलूप लावून कुटूंबासह बाहेर गावी गेले होते. दि.11 डिसेंबर रोजी परत आले तेंव्हा कोणी तरी चोरट्यांनी त्यांचा घराचा दरवाजा तोडून घरातील 3 लाख 13 हजार 850 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. माहूर पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक अण्णासाहेब पवार अधिक तपास करीत आहेत.
अनिल मनोहरराव ढगे (62) हे व्यक्ती 10 डिसेंबर रोजी बॅंकेतून आपल्या पेन्शनचे पैसे काढून ती पैशांची बॅग पेट्रोलच्या टाकीवर असलेल्या कव्हरमध्ये ठेवून जात असतांना दोन अनोळखी बालके आली आणि त्यातील एकाने तुमचे पैसे खाली पडले आहेत असा म्हणाला. अनिल ढगेने वळून पाहिले तेंव्हा 10-30 रुपये दराच्या तीन ते चार नोटा पडलेल्या दिसल्या. मोटारसायकल बाजूला लावून त्यांनी त्या नोटा उचलण्यासाठी गेले असता मागे वळून पाहिले तेंव्हा त्यांची दोन लाख रुपयांची बॅग व बॅंकेचे कागदपत्र घेवून ती बालके पळून गेली आहेत. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हुंडे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळचावडी येथून 23 फेबु्रवारी 2020 रोजी चोरी गेलेल्या दुचाकीचा गुन्हा 11 डिसेंबर 2021 रोजी दाखल करण्यात आलेला आहे. त्यानुसार बाबुराव रामा कांबळे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.बी.3895 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली होती. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार तिडके अधिक तपास करीत आहेत.
बरबडा येथील शंकर पचलिंगे यांच्या घरासमोर मनोज शंकरराव कापसे यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.14 एच.एन.7303 ही 8 डिसेंबर रोजी रात्री उभी केली होती. 9 डिसेंबरच्या पहाटे ही गाडी चोरीला गेली. कुटूंर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे पोलीस अंमलदार निखाते अधिक तपास करीत आहेत.
विनायकनगर येथील साहेबराव तातेराव देशमुख यांच्या घरासमोरच्या टीनशेडमध्ये एक लाल कंधारी गायी उभी होती. शेजारच्या ठाकूर यांच्या घरी सुध्दा दोन लाल कंधारी गायी उभ्या होत्या. या चारही गायी गाभण होत्या. 9 डिसेंबरच्या रात्री 9 ते 10 डिसेंबरच्या पहाटे 6 वाजेदरम्यान कोणी तरी या लालकंधारी गायी चार चाकी वाहनात भरून चोरून घेवून गेल्या आहेत. या गायींची किंमत 1 लाख रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *