क्राईम

5 लाख 23 हजारांचा विश्र्वासघात 

नांदेड(प्रतिनिधी)-एका पेट्रोलपंपाची रक्कम अपहार करून आपल्या फायद्यासाठी वापरणाऱ्या एकाविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपहार प्रकरणातील रक्कम 5 लाख 23 हजार 120 रुपये आहे.
              महेश सुरेशचंद्र सोमाणी या सनदी लेखापालांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोनखेड येथील सुमित पेट्रोलियम मधील व्यवहाराची रक्कम आबासाहेब दादाराव शिंदे रा.श्रावस्तीनगर नांदेड यांच्याकडे दिली. ती रक्कम युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा अशोकनगर येथे जमा करायची होती. पण आबासाहेब दादाराव शिंदेने ती रक्कम बॅंकेत भरलीच नाही. हा सर्व व्यवहार 1 जानेवारी 2021 ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान घडला. भाग्यनगर पोलीसांनी आबासाहेब शिंदे विरुध्द विश्र्वासघात या सदराखाली गुन्हा क्रमांक 419/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 408 नुसार दाखल केला आहे. भाग्यनगरचे प्रभारी पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मुंडे मॅडम अधिक तपास करीत आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.