नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या गस्ती पथकाने 10 डिसेंबर रोजी दोन अवैध वाळू वाहतुक करणारी वाहने पकडून त्यांचा अहवाल मनाठा पोलीस ठाण्यामार्फत तहसीलदार हदगाव यांना पाठवला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार भानुदास वडजे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार संजीव जिंकलवाड, मोतीराम पवार, रणधिर राजवंशी, सुरेश घुगे आणि तानाजी येळगे हे हदगाव तालुक्यात गस्त करत असतांना बामणी फाटा येथे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.26 बी.एस.0698 या गाडीमध्ये सव्वा ब्रास वाळू भरलेली होती. त्याची विचारणा केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुक परवाना नव्हता. या गाडीचा चालक बन्सी उत्तम राठोड हा आहे तर गाडी मालकाचे नाव तेजस शिवाजी वाकोडे रा.पिंपरखेड ता.हदगाव असे आहे. ही गाडी 10 डिसेंबरच्या रात्री भेटली होती.
याच भागात दुसरी एक गाडी क्रमांक एम.एच.26 बी.क्यु.4266 मध्ये बेकायदा वाळू सव्वा ब्रास मोजणीची भरलेली होती. या गाडीचा मालक बालाजी नामदेव साखरे हा व्यक्ती आहे तर गाडी चालक आकाश बबन आडे हा आहे. या दोन्ही वाहनांना पकडून पोलीस ठाणे मनाठा येथे त्यांना उभे करण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार हदगाव यांना स्थानिक गुन्हा शाखेने अहवाल सादर केला आहे.
