नांदेड

शुक्रवारीची एका कोरोना रुग्णाचा मृत्यू;नवीन रुग्ण सापडला नाही                     

नांदेड,(प्रतिनिधी)- आज शुक्रवारी कोरोना विषाणूने एका बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  नवीन रुग्ण दिला. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे.                                                                                    जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या  स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १० डिसेंबर रोजी कोरोना बाधेने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आज नवीन कोरोना रुग्ण सापडला नाही.
              नांदेड मनपा गृहविलगीकरण-०३ रुग्णांला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८३२ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.आज भोकब्रा ता.रेणापूर जिल्हा लातूर येथील ८६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे आज पर्यंत एकूण २६५५ जणांचा मृत्यू कोरोना बाधेने झाला आहे.आज नवीन रुग्ण सापडला नाही.
आज  अहवालांमध्ये ८५१ निगेटिव्ह  ८४९ आणि ०० पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०५०२ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०० आणि ०० अँटीजेन तपासणीत असे एकूण ०० रुग्ण नवीन सापडला आहे. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०२ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
आज कोरोनाचे १५ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -०८,तालुक्यातील विलगीकरण-०३,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०१, खाजगी रुग्णालयात-०३ ,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०१ रुग्ण आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.