नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे शनि मंदिरात झोपलेल्या एका मनसिक रोगी महिलेचा गळाचिरून अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याचा प्रकार आज दि.8 डिसेंबर रोजी सकाळी निदर्शनास आला.
लोहा शहरात राहणाऱ्या छबुबाई ठाकूर या महिला मानसिकरोगी आहेत. लोहा येथील नागरीक सांगतात दिवसभर लोहा शहरात फिरून छबुबाई ठाकूर दररोजच शनिमंदिरात झोपत होत्या. आज दि.8 डिसेंबरची पहाट झाल्यावर लोकांनी छबुबाई ठाकूरचा गळाचिरलेल्या अवस्थेत त्यांना पाहिले. माहिती मिळताच लोहाचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल कऱ्हे आणि अनेक पोलीस अंमलदार घटनास्थळी आले. त्वरीतप्रभावाने आसपास नाकाबंदी करण्यात आली. पण त्याचा काही फायदा झाला नाही.
छबुबाई ठाकूरचे बंधू रामसिंह गोपासिंह ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलीसांनी छबुबाईचा गळा चिरुन खून करणाऱ्या अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केेलेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
