नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालय संत जगनाडे महाराज या महापुरूषांची जयंती पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी केली.
8 डिसेंबर हा महापुरूष संत जगनाडे महाराज यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे, लक्ष्मण राख , सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीमती कलटवाड, शिवाजी लष्करे यांच्यासह सर्वांनी संत जगनाडे महाराज यांना अभिवादन केले. जनसंपर्क विभागाचे पोलीस अंमलदार उत्तम वाघमारे, विनोद भंडारे आणि अफसर खान यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील शाखांचे अधिकारी, पोलीस अंमलदार आणि कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
