नांदेड

6 डिसेंबरच्या पार्श्र्वभूमीवर वजिराबाद पोलीसांचे पथसंचलन

नांदेड(प्रतिनिधी)-6 डिसेंबर रोजीच्या पार्श्र्वभूमीवर आज वजिराबाद पोलीसांनी पथसंचलन केले. 6 डिसेंबर या दिवशी सर्वांनी अत्यंत शांततेत आणि कोरोना नियमावलीप्रमाणे हा दिवस पूर्ण करावा असे आवाहन वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी केले आहे.
उद्या दि.6 डिसेंबर रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन, काळा दिन आणि विजय दिवस असे तीन वेगवेगळे प्रसंग या दिवशी येतात. प्रत्येक धर्मीयांनी आपल्या धर्मातील कोणत्याही बाबी सार्वजनिक रित्या प्रगट करतांना त्यात इतर धर्मीयांना त्रास होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे असे जगदीश भंडरवार सांगत होते. व्यक्तीगत जीवनात प्रशासनाचा कांहीच दखल असू शकत नाही. पण सार्वजनिक रित्या कांही बाबी करत असतांना त्यातील आपली जबाबदारी सर्वांनी समजून घेतली पाहिजे असे सांगितले. आजपर्यंत कोरोना नियमावलीला पुर्णपणे सुट मिळालेली नाही. उलट कोरोना नियमावलीच्या अनेक घटनांमध्ये जास्त बंधने आली आहेत. तेंव्हा जनतेतील सर्व समाजाच्या व्यक्तींनी उद्या दि.6 डिसेंबर रोजी कोरोना नियमावली आणि कार्यक्रमाची परवानगी या सर्व बाबींना लक्षात घेवून समाजात अशांतता पसरणार नाही असे वर्तन ठेवावे असे सांगितले.
6 डिसेंबरच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस ठाणे वजिराबाद येथील पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार , राखीव पोलीस दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान आदींनी आज एक पथसंचलन केले. त्यांनी वजिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अनेक वस्त्यांमधून हे पथसंचलन गेले आणि त्याचा शेवट वजिराबाद पोलीस ठाण्यात झाला.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.