नांदेड

दारु हवी असेल तर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेवून या

नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना नियमावलीमध्ये कांही बाबी आता बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्यात कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे हा एक भाग आहे. शासनाच्यावतीने अद्याप बंधनकारक आदेश निघाला नसला तरी कांही दारु विक्रेत्यांनी मात्र आपल्या दुकानात येतांना कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असावेत आणि मास्क लावूनच प्रवेश करावा असे बोर्ड लावले आहेत. यावरुन कमीत कमी मद्यशौकीन तरी कोरोनाचे लसीकरण लवकर करून घेतली असे वाटते.
फेबु्रवारी 2020 पासून कोरोना विषाणुने भारतात आपली मुळे रोवायला सुरू केली. आतापर्यंत जवळपास भारतातील 100 कोटी लोकांनी कोरोना लसीकरण करून घेतले आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मात्र अद्याप मागे आहे. शासनाच्यावतीने कोरोना लसीकरण बंधनकारक व्हावे यासाठी अनेक चर्चा घडत असतांना शासनाने मात्र तसा कोणताही आदेश पारीत केलेला नाही. तरी जनतेने जागतिक समस्या असलेल्या या आजारावर लसीकरण घेणे धोकादायक नाही हे आजपर्यंत लसीकरण घेतलेल्या लोकांना पाहुन समजू शकतो. तेंव्हा लसीकरण घेणे छानच आहे. अनेक जागी जादा मंडळी जमल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला. याचे उदाहरण उज्जैन शहर आहे.महाकालाची नगरी असलेल्या या उज्जैन शहर पुन्हा लॉकडाऊनच्या मार्गावर आहे. अशी ही कोरोनाची परिस्थिती असतांना एक गंमतीदार प्रसंग समोर आला.
या प्रसंगानुसार कांही मद्यविक्रेत्यांनी आपल्या दुकानाबाहेर दोन लसीकरणाचे डोस घेतलेल्या लोकांनी मास्क घालूनच दुकानात प्रवेश करावा असे बोर्ड लावले आहेत. शासनाच्यावतीने बंधन कधी येईल याबद्दल कांही सांगता येत नसेल तरी मद्य विक्रेत्यांनी आणलेल्या या बंधनामुळे नक्कीच लसीकरणाच्या गतीमध्ये प्रगती येईल असेच म्हणावे लागेल.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *