क्राईम

कठोर शर्थीसह आंतरराष्ट्रीय पत्रकार शेख याहीयाला जामीन मंजूर

नांदेड,(प्रतिनिधी)- आठवड्यातून तीन दिवस नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार तास हजेरी लावत अतिरिक्त सत्र न्यायाधीश नितीन खोसे यांनी आंतराष्ट्रीय पत्रकार शेख याहीया शेख इसाकला अटकेच्या २० दिवसांनंतर जामीन मंजूर केला आहे.
                           नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार शेख याहीया शेख इसाक आणि शेख अजीज बाबा शेख मुस्तफा यांनी तिचा बिघडलेला संसार तंत्र मंत्र यांच्या साहाय्याने दुरुस्त  हूल देऊन त्याच्यावर शारिरीक अत्याचार केला.एवढेच नव्हे तर तिचे
अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले. तिला ब्लॅक मेल करून असे अनेकदा केले.तेव्हा तिने दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा क्रमांक ८१२/२०२१ दाखल केला.या गुन्ह्याचा तपास नांदेड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याकडे देण्यात आला.
                              सर्व प्रथम पत्रकार शेख याहीया शेख इसाकला अटक झाली.सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर शेख याहीयाची रवानगी तुरुंगात झाली.त्याच्यावतीने नांदेड येथील श्रेष्ठ विधीज्ञ ऍड.इद्रिस कादरी यांनी याहीयाचा जामीन अर्ज क्रमांक ९१९/२०२१ मध्ये बाजू मांडताना सांगितले की,शेख याहीयाने फक्त फोटो आणि व्हिडीओ पीडितेच्या बहिणीला पाठवले आहेत.तेव्हा हा पक्षकार ३७६ च्या व्याख्येत बसत नाही.तसेच पोलिसांनी त्याचे मोबाईल जप्त केले आहेत.
                          सर्व युक्तिवाद ऐकून न्या.नितीन खोसे यांनी कठोर शर्थीसह शेख याहीया शेख इसाक यास जामीन मंजूर केला आहे.
अश्या आहेत शर्थी 
शेख याहियाला दर आठवड्यात सोमवार,बुधवार आणि शनिवार या तीन दिवशी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे सकाळी १० ट्रे दुपारी २ असे चार तास हजेरी देणे आहे.हि हजेरी पोलीस दोषारोप दाखल करे पर्यंत कायम राहील. शेख याहीयाने साक्षीदारांना त्रास द्यायचा नाही.पिडीत महिलेला थेट किंवा कोणच्यावतीने धमकी,विश्वास देणे यावर बंधन आहे.पिडीतेविरुद्ध कोणताही गुन्हा करायचा नाही. कोणतेही अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायचे नाहीत.न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले तर जामीन रद्द करण्यासाठी हे एक कारण सुद्धा असेल.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *