नांदेड

शुक्रवारी कोरोनात आनंदाची बातमी;मृत्यू नाही अणि नविन रुग्ण एक 

नांदेड,(प्रतिनिधी)- आज शुक्रवारी कोरोना विषाणूने 1257 तपासणीत एक नवीन रुग्ण दिला आहे. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 21 आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी 97.04  अशी आहे.
          प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 03 डिसेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज एक नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे.
               नांदेड मनपा गृह विलगीकरण-01, खाजगी रुग्णालय-01 अशा 03 रुग्णांला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 87817 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 97.04 टक्के आहे.
आज 1257 अहवालांमध्ये 1252 निगेटिव्ह  आणि  01 पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 90492 झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत 01 आणि  अँटीजेन तपासणीत 00 असे एकूण  01 रुग्ण नवीन सापडला आहे. आज स्वॅब तपासणी 00 अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 04 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 00 आहेत. आज सापडलेला नवीन एक रुग्ण मनपा हद्दीतील आहे.
                 आज कोरोनाचे  ऍक्टीव्ह 21 रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -15,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-03, खाजगी रुग्णालयात- 03,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात 02 रुग्ण आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.