महाराष्ट्र

राज्यात 175 पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक पदोन्नती

नांदेड जिल्ह्यातील चार आणि लातूर जिल्ह्यातील एकाचा समावेश
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने राज्यभरातील 175 वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त अशी पदोन्नती दिली आहे. यामध्ये नांदेड येथील चार जणांचा समावेश आहे आणि लातूर येथील एक पोलीस निरिक्षक पोलीस उपअधिक्षक झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार राज्यभरातील 175 वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर पदोन्नत्या देण्याच्या आदेश जारी झाले आहे. त्यामध्ये नांदेड येथील किनवट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मारोती ज्ञानोजी थोरात यांना पदोन्नती देवून उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार उपविभाग येथे नियुक्ती देण्यात आली आहे. सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले धरमसिंग जेमा चव्हाण यांना पदोन्नती देवून एक टप्पा पदोन्नतीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे अपर पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेडच्या बॉम्ब शोध व नाशक पथकात कार्यरत असलेले मधुसुदन देविदास अंकुशे यांना अपर उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नांदेड येथे नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड येथील विजय नागोराव डोंगरे यांना पदोन्नतीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट उपविभाग येथे नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रातील लातूर जिल्ह्यात कार्यरत सुनिल बन्सीलाल पुजारी यांना पदोन्नती देवून उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम जिल्हा अकोला येथे नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचे सुपूत्र औरंगाबाद शहरात कार्यरत अनिल परसराम आडे यांना पदोन्नती देवून पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद जिल्हा यवतमाळ येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
या व्यक्तीरिक्त नांदेड येथे पुर्वी कार्यरत असलेले पोलीस अधिकारी राजेंद्र पांडूरंग कुंटे यांना अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे.  मल्लिकार्जुन प्रल्हादराव इंगळे यांना चंद्रपूर जिल्ह्यात मुल उपविभागाचे पोलीस अधिक्षक अशी नियुक्ती देण्यात आली आहे. नवी मुंबई येथील सुर्यकांत दत्तात्रय जगदाळे यांना अमरावती ग्रामीण उपविभागात नियुक्ती देण्यात आली आहे. नाशिक शहरात कार्यरत  संभाजी सर्जेराव निंंबाळकर यांना अपर उपायुक्त राज्यगुप्त वार्ता विभाग नाशिक येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.