नांदेड

एस.टी. संपकरी वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

संघटनेकडून 50 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी
नांदेड(प्रतिनिधी)-एस.टी.विभागातील संपात सहभागी असलेल्या एका वाहकाचा आज सकाळी मृत्यू झाल्यानंतर संघटनेने नुकसान भरपाई म्हणून 50 लाखांची मागणी केली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत संपकरी मरण पावलेल्या वाहकाचा मृत्यदेह बसस्थानकातच होता.
महाराष्ट्रातील परिवहन विभाग (एस.टी.) कर्मचारी संघटना एकत्रीत होवून त्यांनी संयुक्तीक मागण्या जाहीर करून पुकारलेला संप आजही सुरू आहे. त्यामुळे एस.टी.विभागाला करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोबतच संपात सहभागी चालक वाहक यांना वेतन मिळत नसल्याने त्यांची सुध्दा परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. शासनाने दाखवलेल्या तयारीला संपकरी मंडळी तयार नाहीत आणि संपकरी मंडळीच्या मागणीला महामंडळ प्रतिसाद देत नाही अशा आवस्थेत हा एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना सुध्दा मोठी समस्या झाल    ी आहे. ज्या ठिकाणी रेल्वे मार्ग नाही त्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी आता साधन शिल्लक राहिले नाही. त्यामुळे खाजगी वाहतुकदार जास्तीचे पैसे घेवून प्रवाशांची लुट करीत आहेत.
शासनाने काढलेल्या आदेशानंतर परिवहन विभागाने अनेक संपकरी चालक व वाहकांना अगोदर निलंबित केले. त्यानंतर कांही जणांवर बडतर्फीची कार्यवाही झाली. तरीपण संपकरी संघटना आपला पाय मागे घ्यायला तयार नाही. नांदेड येथील वाहक पदावर कार्यरत दिलीप विठ्ठलराव विर (50) यांच्या निलंबनाचे आदेश निघाले.त्यांना 2 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  आज दि.3 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता  दिलीप विठ्ठलराव विर यांची प्राणज्योत मालवली.  त्यानंतर संघटनेच्या लोकांनी दिलीप विर यांचे पार्थिव शरीर बसस्थानकात आणून ठेवले. तेथे गर्दी झाली तेंव्हा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा बसस्थानकात आला.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार दिलीप विर यांच्या मृत्यूबद्दल त्वरीत प्रभावाने 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तरच विर यांच्यावर अंतिमसंस्कार करू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. राज्यात एस.टी.महामंडळाच्या कर्मचारी संपाला आता वेगवेगळे वळण लागायला लागले आहेत. प्रशासनाने यावर त्वरीत प्रभावाने उपाय योजना करण्याची गरज निकडीची आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *