क्राईम

शेतकऱ्याच्या कापुस विक्रीचे 3 लाख 88 हजार रुपये चोरले

सहा चोऱ्यांमध्ये 8 लाख 99 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे एका टेम्पोतील 3 लाख 88 हजार 200 रुपयांची चोरी झाली आहे. तामसा येथे एक घरफोडून 3 लाख 49 हजारांची चोरी झाली आहे. भोकर येथे एक भुसार दुकान फोडून त्यातून 1 लाख 1 हजार 500 रुपयांचे सोयाबीन चोरीला गेले आहे. यासोबत शहरातील वजिराबाद , किनवट आणि नांदेड ग्रामीण या ठिकाणी तीन वेगवेगळ्या चोऱ्या पोलीस दप्तरी नोंद आहेत. सर्व सहा चोरी प्रकरांमध्ये मिळून 8 लाख 99 हजार 295 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
हुल्लेवाडी ता.लोहा येथील बापूराव नारायण कोपनर (60) हे शेतकरी 1 डिसेंबर रोजी सकाळी आपल्याच चार चाकी वाहनात कापुस भरून घेवून आले आणि लोहा येथील मोरे ट्रेडींग कंपनीकडे ते कापुस विक्री करून त्याचे 3 लाख 88 हजार 200 रुपये गाठोडे बांधून टेम्पोत ठेवले. त्यावेळी एका मुलाने चार चाकी वाहनासमोर येवून सांगितले की, तुमच्या गाडीचे ऑईल गळत आहे. हे पाहण्यासाठी गाडीचालक त्यांचा मुलगा आणि ते स्वत: खाली उतरले त्यावेळी पैशाचे गाठोडे गाडीतच ठेवले होते. खाली उतरल्यावर गाडीतून कुठेही ऑईल गळत नसल्याचे दिसले. पुन्हा ते गाडीत बसले असता 3 लाख 88 हजार 200 रुपयांचे गाठोडे गायब झाले होते हा प्रकार नांदेड-लोहा रस्त्यावर आष्टुरकर वॉटर सर्व्हीसिंग सेंटरसमोर घडला. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
सौ.सरस्वती बालाजी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर तामसा येथील त्यांचे घर बंद करून त्या 30 नोव्हंेंबर रोजी कांही कामासाठी बाहेर गावी गेल्या. 1 नोव्हेंबर रोजी परत आल्या तेंव्हा त्यांच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप कडीकोंडा तोडून कोणी तरी त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 3 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. तामसा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक किरवले अधिक तपास करीत आहेत.
उध्दव पांडूरंग ढगे यांच्या तक्रारीनुसार 30 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता किनवट-भोकर रस्त्यावरील त्यांच्या बालासाई ट्रेडर्स दुकानाचे शटर कोणी तरी तोडले आणि  त्यातील 17 क्विंटल सोयाबीन, 1 लाख 1 हजार 500 रुपये किंमतीचे चोरून नेले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक तांबोळी अधिक तपास करीत आहेत.
किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालय येथील ऑक्सिजन पाईप, 42 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी 28-29 नोव्हेंबरच्या रात्री चोरून नेले आहेत. याबाबत डॉ.उाम धुमाळे यांच्या तक्रारीवरुन किनवट पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक कोलबुध्दे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजी चौक सिडको येथे जाजू रुग्ण सेवालय आहे. डॉ.देवानंद बन्सीलाल जाजू हे रुग्ण तपासत असतांना 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास कोणी तरी त्यांचा 11 हजार 500 रुपयांचा मोबाईल चोरून नेला आहे. सिडको पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.
वजिराबाद येथील लक्ष्मी एजन्सीमध्ये खरेदी करण्यासाठी आलेले प्रदीप संभाजीराव मोरे यांनी आपले खरेदी केलेले साहित्य एका पोत्यामध्ये बांधून ऍटोमध्ये ठेवले. त्यांची नजर चुकवून कोणी तरी ते 7 हजार 95 रुपये किंमतीचे साहित्य असलेले पोते 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाता चोरून नेले आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार उत्तकर अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *