अटकेतील चार आणि फरार तीन ज्यात दोन महिला ;दोषारोप दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-भाऊराव सहकारी साखर कारखान्यात साखर खरेदी करून ती साखर निर्यात पुर्ण न करणाऱ्या दोन महिलांसह सात जणांविरुध्द नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेने 9 नोव्हेंबर रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यातील तीन जणांविरुध्दचे दोषारोप फरार या सदाराखाली आहेत. तर चार जण अटकेत आहेत. त्यांना जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारलेला आहे.
दि.22 ऑगस्ट 2021 रोजी भाऊराव सहकारी साखर कारखाना लक्ष्मीनगर, येळेगाव ता.अर्धापूरचे कार्यकारी संचालक शामसुंदर रुक्मानंद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुलै 2020 ते ऑक्टोबर 2020 दरम्यान चेन्नई येथील कुरूंजी प्रो नॅचरल फुड्स वलसरावक्कम चेन्नई तामिळनाडू यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची पाच कोटी 93 लाख 65 हजार 536 रुपयंाची फसवणूक केली आहे. या गुन्ह्याच्या तक्रारीनुसार तामीळनाडूच्या कंपनीला भाऊराव साखर सहकारी कारखान्याच्या युनिट क्रमांक 3 आणि 4 कडून अनुक्रमे 988 मेट्रीक टन 2700 मेट्रीक टन साखर खरेदी केली. साखर अधिनियमाप्रमाणे ही साखर निर्यात करण्यासाठी खरेदी केली होती. पण त्यांनी साखर निर्यात केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर भाऊराव सहकारी साखर कारखान्याला 5 कोटी 93 लाख 65 हजार 536 रुपये केंद्र सरकारच्यावतीने अनुदान मिळणार होते आणि यासाठीच हा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा क्रमांक 86/2021 पोलीस ठाणे बारड येथे दाखल झाला. अत्यंत गुप्तरितीने सुरू झालेल्या या तपासात प्रदीपराज चंद्राबाबू, अभिजित वसंतराव देशमुख, इंडिया मनिकांता उर्फ मुन्नीकृष्णा चंद्रशेखर आणि सुर्यनारायण उर्फ एम. सुरेश उर्फ दालमिल सुरी व्यंकटरामप्पा मोरमिशेट्टी या चौघांना अटक झाली. या प्रकरणाचा तपास झाला त्यात पुढे पांडू व्यंकटरामअप्पा मोरमिशेट्टी उर्फ बालाजी वासुदेवन उर्फ बालाजी रामलिंगम, त्याची पत्नी सविता पांडू उर्फ बालाजी वासुदेवम आणि महालक्ष्मी सुर्यनारायण उर्फ एम.सुरेश मोरमीशेट्टी हेही गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात अनुक्रमे 1 ते 4 यांना जिल्हा न्यायालयाने सुध्दा जामीन नाकारलेला आहे. इतर तिघे पोलीसांना सापडले नाहीत.
नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांनी दि.19 नोव्हेंबर रोजी या गुन्हा क्रमांक 86/2021 मध्ये दोषारोपपत्र क्रमांक 54/2021 दाखल केले. त्यावर न्यायालयाने आरसीसी क्रमांक 127/2021 अशी नोंद 20 नोव्हेंबर रोजी केली आहे. याप्रकरणात कोट्यावधीचा आकडा असला तरी एकही रुपया जप्त करण्यात आलेला नाही.
