नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील नंदगाव येथे आपल्या 28 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचा खून करणाऱ्या नवऱ्याला मुखेडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिंदे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बिलोली येथील दत्ता देवराव इंद्राक्ष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 नोव्हेंबर रोजी नंदगाव (प.क.)ता.मुखेड येथे भाग्यश्री उर्फ सुलोचना दत्ता तांबोळी (28) हिच्या चारीत्र्यावर संशय घेवून नवरा दत्ता तांबोळीने तिचा खून केला आहे. मुखेड पोलीसांनी या बाबत गुन्हा क्रमांक 347/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 , 498(अ) नुसान गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिखक प्रकाश कुंभारे यांच्याकड आहे.
आज दि.2 डिसेंबर रोजी प्रकाश कुंभारे यांनी आपल्या पत्नीचा खून केल्या प्रकरणी दत्ता तांबोळीला मुखेड न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिंदे यांनी दत्ता तांबोळीला दोन दिवस,अर्थात ४ डिसेंबर २०२१ पर्यँत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
