नांदेड(प्रतिनिधी)-2 ऑगस्ट 2020 रोजी शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण चौकात विक्की रामसिंग चव्हाण याच्या खून प्रकरणातील चार आरोपीना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी जामीन मंजुर केला आहे.
विक्की चव्हाण खून प्रकरणात विमानतळ पोलीसांनी एकूण 14 आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यांचा खटला आता सुरू होण्याचा मार्गावर असतांना त्यातील कांही लोकांविरुध्द मकोका कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
या प्रकरणातील आरोपी संतोष तरटे, केशव नहारे, सुशील गावखरे, दिलीप डाखोरे या चार जणांच्यावतीने ऍड. मिलिंद एकताटे, आणि ऍड. शिवराज पाटील लोहगावकर यांनी जामीन अर्ज सादर केला. या चार जणांविरुध्द कोणताही पुरावा दोषारोपत्रात नाही म्हणून त्यांना जामीनवर मुक्त करण्याचा युक्तीवाद मांडण्यात आला. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश के.एन. गौतम चारही आरोपींना जामीन मंजुर केला आहे. याप्रकरणात ऍड. कदम, ऍड.नयुम पठाण यांनी सुध्दा परिश्रम घेतले आहेत.
