ताज्या बातम्या

उपमहापौरपदी अब्दुल गफार, स्थायी समिती सभापती पदावर किशोर स्वामी

औपचारीक घोषणा शिल्लक
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदावर नगरसेवक अब्दुल गफार यांची वर्णी लागणार आहे. सोबतच स्थायी समिती सभापती पदावर किशोर स्वामी यांचा नंबर लागला आहे.औपचारिक घोषणा आता शिल्लक राहिली आहे. हा सर्व राजकीय खेळ मानला जात असून पुढे येणाऱ्या ऑक्टोबर 2022 मधील मनपा निवडणुकीला लक्षात ठेवून वर्णी लावण्यात आली असल्याची चर्चा आहे.
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर पदावर सौ जयश्री निलेश पावडे यांची सर्वप्रथम वर्णी लागली. जयश्री पावडे ह्या उच्च शिक्षीत आहेत आणि एका मोठ्या गटाला आपल्याकडे आकर्षीत करण्याचा हा कॉंगे्रसचा प्रयत्न आहे अशी चर्चा त्याहीवेळी झाली होती. राजकीय डावपेचामध्ये असे झाले असेल तरी त्यात वावगे काय? पुढे सभागृहनेता पदी ऍड. महेश कनकदंडे यांना संधी मिळाली. त्यानंतर उपमहापौर रिक्त पद आणि स्थायी समिती सभापती पद रिक्त झाले. यावर कोणाची वर्णी लागणार आणि त्याची गणीते काय असणार यावर चर्चा झाली. कॉंगे्रस पक्षाने आता गणीतांचे उत्तर जाहिर केले आहे. उपमहापौर पदावर अब्दुल गफार यांची नियुक्ती होणार आहे आणि स्थायी समिती सभापती पदावर किशोर स्वामी यांची वर्णी लावण्यात आली आहे.
या नवीन नियुक्त्यांमध्ये राजकीय गणीत नक्कीच आहे आणि प्रत्येक पक्षाला ते राजकीय गणित करण्याचा अधिकार पण आहे. विषय निवडणुक 2022 चा आहे. त्या दिवसाला किंवा त्या घटनेला लक्षात ठेवून या नवीन नियुक्त्या झाल्या असतील तर त्याचा किती परिणाम सकारात्मक मिळतो हे कॉंगे्रस पक्षाला ऑक्टोबर 2022 मध्ये मिळेल.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.