नांदेड

मंगळवारी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू;कोरोनाने दिले चार नवीन रुग्ण;तिघांची सुट्टी;अतीगंभीर रुग्ण दोन  

नांदेड,(प्रतिनिधी) – आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे . आज मंगळवारी कोरोना विषाणूने नवीन चार रुग्ण दिले आहेत.आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २४ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे.
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी कोरोना बाधेने एक रुग्ण दगावला आहे.आज चार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा गृह विलगीकरण- ०३  रुग्णांला  उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८१२ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
आज १५८ अहवालांमध्ये १५३ निगेटिव्ह आणि ०४ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०४९० झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०४ आणि  अँटीजेन तपासणीत ०० असे एकूण ०४ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी  अहवाल  ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०१ आहेत. सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे उमरखेड येथील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आज सापडलेले नवीन रुग्ण नांदेड मनपा -०३ आणि नांदेड ग्रामीण-०१, आहेत.
आज कोरोनाचे २४ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१८,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०३, खाजगी रुग्णालयात- ०३,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात  ०२ रुग्ण आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.