क्राईम

विधीसंघर्ष बालकाकडून 33 हजारांचा ऐवज जप्त 

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे रामतीर्थच्या हद्दीत झालेल्या चोरी प्रकरणात एका अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून 33 हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे रामतिर्थ येथे गुन्हा क्रमांक 246/2021 दाखल झाला. या गुन्ह्यात चोरी गेलेला ऐवज एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून 27 नोव्हेंबर रोजी जप्त करण्यात आला आहे. या बालकाकडून 9 ग्रॅमची 30 हजार रुपये किंमतीची चोन्याची अंगठी आणि 3 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल सापडला आहे. जो त्याने चोरी केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव हे करीत आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.