क्राईम

मुलीच्या प्रियकराचा काटा तिचे वडील आणि मामाने काढला

एका महिण्यापुर्वी झालेल्या खुनातील प्रेत मुक्रमाबाद पोलिसानी शोधले 
नांदेड,(प्रतिनिधी)- म्हणतात ना पोलिसांनी आपल्या मनावर घेतले की  गुन्हेगारांना शोधतात.असाच एक दखल घेण्यासारखा खुनाचा गुन्हा मुक्रमाबाद पोलिसांनी उघडकीस आणला आहे.३१ ऑक्टोबर रोजी केलेल्या खुनाचा शोध लावून दोन मारेकऱ्यांनां गजाआड  केले आहे.न्यायालयाने दोघांना १ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.आपल्या मुलीच्या प्रियकराचा काटा वडील आणि तिचा मामा अश्या दोघांनी मिळून काढला आहे.
                         हासनाळ (प.स.) ता.मुखेड येथील एक युवक सुर्यकांत नागनाथ जाधव (२२ ) हा ३१ ऑक्टोबर रोजी गायब झाला.नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतल्यावर त्याच्या गायब होण्याबाबत ८ नोव्हेंबर रोजी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात सूर्यकांत जाधवच्या संदर्भाने मिसिंग (हरवला) अशी नोंद करण्यात आली. पोलिसांनी मिसिंग बाबत तपास सुरू केला तेव्हा अनेक माहिती पोलिसांना प्राप्त होत होत्या.आलेल्या माहितीचे संकलन करून पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी अश्या सर्वांचे मार्गदर्शन घेत मुक्रमाबादचे सहायक पोलीस निरीक्षक  संग्राम जाधव यांनी हळू हळू आपली प्रगती करत काम सुरु ठेवले.
                          मुक्रमाबाद पोलिसांना अशी खास माहिती प्राप्त झाली की,सूर्यभान जाधवचे आपल्याच नात्यातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते.जवळपास जून २०२१ मध्ये त्यांच्या प्रेमाची कुणकुण पसरली आणि सुर्यभानने आपले गाव हासनाळ सोडले.३० ऑक्टोबर रोजी त्याची जागा पोलिसांनी शोधली.तेव्हा तो ३१ ऑक्टोबर रोजी गावात येणार आणि आपल्या प्रेयसीला घेऊन जाणार याची खबर प्रेयसीचे वडील माधव सोपान थोटवे रा. हसनाळ (प.मु. ) व त्याचा मेव्हणा अर्थात प्रेयसीचा मामा पंढरी मरीबा गवलवाड रा.कोळनूर ता. मुखेड यांना मिळाली.त्या दोघांनी एक खलबत रचले.गावाकडे येणाऱ्या रस्त्यावरच सूर्यकांतला रावणकुळ शिवारात गाठले आणि सूर्यकांतचा खून करून त्याचे प्रेत खड्डा करून पुरून टाकले.
                      मी नाही त्यातली अश्या अविर्भावात माधव थोटवे आणि पंढरी गवलवाड वागत राहिले.आपल्याला आव्हान असेल आणि पोलीस त्या आव्हानाला सोडून जातील असे बहुदा खूप कमी होते. मुक्रमाबाद सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, देगलूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, पोलीस उप निरीक्षक गोपीनाथ वाघमारे,गजानन कागणे,बाऱ्हाळी पोलीस चौकीचे जमादार योगेश महिंद्रकर, हांडे, बब्रूवान लुंगारे, माधव पवार आदीनी आपले कसब लावून अखेर याबाबत सूर्यकांताचा बंधु रमाकांत जाधवच्या तक्रारीवरून सूर्यकांतचे अपहरण धव सोपान थोटवे रा. हसनाळ (प.मु. ) व त्याचा मेव्हणा अर्थात प्रेयसीचा मामा पंढरी मरीबा गवलवाड रा.कोळनूर ता. मुखेड यांनी केल्याचा गुन्हा दाखल केला.त्यात सुद्धा मला काहीच माहित नाही असे दाखवणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांना पोलिसांनी अखेर बोलते केले.
                          २८ नोव्हेंबर रोजी धव सोपान थोटवे रा. हसनाळ (प.मु. ) व त्याचा मेव्हणा अर्थात प्रेयसीचा मामा पंढरी मरीबा गवलवाड रा.कोळनूर ता. मुखेड या दोघांनी सूर्यकांतला जीवे मारून खड्डा खोदून त्यात गाडले ते ठिकाण दाखवले.तलाठी कदम यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात पोलिसांची मदत केली.त्यानंतर धव सोपान थोटवे रा. हसनाळ (प.मु. ) व त्याचा मेव्हणा अर्थात प्रेयसीचा मामा पंढरी मरीबा गवलवाड रा.कोळनूर ता. मुखेड विरुद्ध गुन्ह्याचा आणि पुरावा लपवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,न्यायालयाने दोघांना १ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
                       ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या खुनाचा उलगडा नांदेड जिल्हा पोलीस विशेष करून मुक्रमाबाद पोलिसानी आपले कसब वापरून केला आहे.नाहीतर अनेक अशे प्रसंग आहेत की, उल्लेखित करणे आयोग्य आहेत.पण मुक्रमाबाद पोलिसांनी केलेला ता तपास दर्जेदार अन्वेषण या व्याख्येत लिहून त्यांना शाबासकी देण्यासाठी उत्तम आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.