

नांदेड(प्रतिनिधी)-बेकायदेशीर रित्या, परवाना नसतांना आपल्या फायद्यासाठी देशी दारुचा साठा करून तो विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या उमरी तालुक्यातील एका व्यक्तीला उमरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.एस.धपाटे यांनी 25 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.17 जानेवारी 2016 रोजी तुराटी ता.उमरी येथे पोलीसांनी छापा मारला तेंव्हा विठ्ठल नारायण म्हैसनवाड याच्या घरात देशी दारुच्या 10 बॉटल्या सापडल्या. याबाबत पोलीस अंमलदार व्यंकट मुंडे यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे उमरी येथे मुंबई पोलीस कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. उमरी न्यायालयात याबाबत खटला क्रमांक 46/2016 दाखल झाला. या खटल्यात पाच साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयात नोंदवले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश आर.एस.धपाटे यांनी बेकायदेशीर रित्या दारु बाळगणाऱ्या विठ्ठल म्हैसनवाडला 25 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड भरला नाही तर विठ्ठल म्हैसनवाडला एक महिना साध्या कैदेची शिक्षा प्रस्तावित करण्यात आली आहे. खटला दाखल झाला होतो तेंव्हा विठ्ठल नारायण म्हैसनवाडचे वय 70 वर्ष लिहिलेले आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड. गिरीश मोरे यांनी मांडली.