शिक्षण

नाट्य शास्त्राचा अभ्यासक्रम म्हणजे व्यक्तिमत्व विकास होय-प्रा. दत्ता भगत

नांदेड(प्रतिनिधी)-नाट्य शास्त्राचा अभ्यासक्रम म्हणजे  व्यक्तिमत्व विकास होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ  मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने  स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून विद्यापीठ परिक्षेत्रातील नाट्यसंस्था, रंगकर्मी आणि कलाकार यांना जोडण्याच्या हेतूने  ‘नाट्यरंग व्यासपीठ’ या कार्यक्रमाच्या  उद्घाटन  प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन परिषद सदस्य व आंतर विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. दिपक बच्चेवार आणि संकुलाचे संचालक डॉ. पी. विठ्ठल यांची विशेष  उपस्थिती होती.

उद्घाटन प्रसंगी  विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी क्रीडा प्रशिक्षण आणि कला प्रशिक्षण ही शिक्षणाची अविभाज्य अंग असले पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच  संकुलाचे अनेक नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू केल्याचे सांगितले. जानेवारीपासून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या  संयुक्त विद्यमाने काही कोर्सेस जानेवारीपासून राबविणार येणार असल्याचेही ते म्हणाले. यासोबतच पुढील वर्षापासून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्टिफिकेट कोर्सेस आणि पोस्ट डिप्लोमा कोर्सेस सुरू होत असल्याचे सांगितले. डॉ. अनुराधा जोशी यांच्या संकल्पनेतून व संकुलाचे संचालक डॉ पी.  विठ्ठल याच्या प्रेरणेने  सदरील कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यापीठ परिक्षेत्रातील नाट्यसंस्था प्रमुख व कलावंतांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये डॉ. सुरेश पुरी, डॉ. जीवन पिंपळवाडकर, डॉ. नाथा चितळे, डॉ. जगदीश देशमुख, रविशंकर झिंगरे, किशोर पुराणिक, सुहास देशपांडे, सौ. स्वाती देशपांडे, राम चव्हाण, दिनेश कवडे व अभिलाषा  पिंगळे  यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नाट्यकलावंत रंगकर्मी उपस्थित होते.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये संगीत शाकुन्तलम् या नाटकातील नांदी संकुलाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. या मध्ये दिपा बोंडलेवार, आकांक्षा मोतेवार, वैष्णवी इंगळे, गजानन गोंधळी, गणेश महाजन यांनी सादर केला.  यासाठी साथसंगत शंकर गोडसे व प्रणव पडोळे, चंद्रकांत गोडसे यांनी केली. तसेच संगीत सौभद्र नाटकातील  प्रसंग शुभम कांबळे आणि सौ. रूपाली जोशी यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्याच बरोबर संकुलाची माजी विद्यार्थिनी सौ. स्वाती देशपांडे हिने मीरा मधुरा मधील एक प्रसंग उत्कृष्ट सादर केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचाल डॉ. पी . विट्ठल यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनुराधा जोशी व विश्वास आंबेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. रमाकांत जोशी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकुलातील प्रा. किरण सावंत, प्रशांत बोंपीलवार प्रा. रतन सोमवारे तसेच  ज्ञानेश्वर पुयड, प्रकाश रगडे आणि अजीज पठाण यांनी सहकार्य केले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.