नांदेड(प्रतिनिधी)-प्रशिक्षणार्थ असणाऱ्या एका डॉक्टर युवतीची दुचाकी गाडी शासकीय रुग्णालयातील महिला वस्तीगृहासमोरून चोरीला गेली आहे.
डॉ.योगीता सदाशिव पुरेकर या मुळ कोल्हापूर जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत आणि सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे शिक्षण घेत आहेत. त्या तेथेच महिला वस्तीगृहात राहतात. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 25 नोव्हेंबरच्या सकाळी 9 या वेळेदरम्यान तेथे त्यांनी उभी केलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.09 ए.यु.6721 ही 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी रुग्णालयातील अंतर रुग्ण विभागाबाहेर पार्किंगच्या शेडमध्ये उभी केली होती. ती कोणी तरी चोरून नेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार रामदिनवार अधिक तपास करीत आहेत.
