नांदेड

युवक काँग्रेसच्यावतीने संविधान व शहीददिन साजरा

नांदेड (प्रतिनिधी )- युवक काँग्रेस उत्तर नांदेडच्यावतीने सहयोगनगर चौरस्ता येथे भारतीय संविधानदिन व २६/ ११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अभिवादन कार्यक्रम सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला होता.

युवक काँग्रेस उत्तरचे महासचिव हंसराज सुभाष काटकांबळे यांच्यावतीने सहयोगनगर येथे संविधानदिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर मुंबई येथील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व मेनबत्ती प्रज्वलीत करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डी.पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रफुल्लदादा सावंत हे होते. या प्रसंगी पूजनिय भदंत शिलरत्न, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई निलेश पावडे, नांदेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड, निलेश पावडे, काँग्रेसचे सभागृह नेते महेश कनकदंडे, स्थायी समितीचे नवनिर्वाचित सदस्य नगरसेवक महेंद्र पिंपळे, नगरसेवक संजय पांपटवार, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठलभाऊ पावडे, अर्धापूरचे माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी सोनाजी सरोदे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय वाघमारे, युवक काँग्रेसचे विक्की राऊतखेडकर, नागेश सुलगेकर, मिडीया प्रमुख हरविंदरसिंघ संधू, रमेश कोकरे, राजेश बिहऱ्हाडे, बंटी मगरे, युवक काँग्रेसचे महासचिव शेख कलीम, नांदेड जिल्हा- शहर काँग्रेस चिटणीस सुभाष काटकांबळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितेश दुर्गम, शुभम पाटील वाघमारे, अमित गोडबोले, साई देसराज, सोहेल सय्यद, प्रज्वल मवाडे, देवानंद मंदाळे, योनाथान चव्हाण, विशाल दुर्गम, आदींनी परिश्रम घेतले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.