नांदेड

स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात करोडो रुपयांच्या जीएसटी चोरीचा घोटाळा समोर आला

औरंगाबादच्या एका व्यक्तीला अटक 
नांदेड(प्रतिनिधी)-२० नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या एका बायोडिझेल प्रकरणाला आता जीएसटी घोटाळा असे वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज औरंगाबाद येथील युवकाला पोलीसांनी बनावट प्रकारे जीएसटी क्रमांकाचा वापर बायोडिझेल प्रकरणात केल्यामुळे अटक केली आहे.
             नोव्हेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने बोंढार शिवारात एम.एच.३८ ई.१४३८ क्रमांकाचा छोटा हत्ती हे वाहन पकडले त्यामध्ये १२०० लिटर बायोडिझेल होते. याप्रकरणी त्या गाडीचा चालक मुतहार खान महेबुब खान (२०) यास अटक करण्यात आली होती. मुतहार खानला न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
          याप्रकरणी बायोडिझेल पाठवणार्‍या मुंबई येथील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे अत्यंत धडाकेबाज फौजदार डॉ.परमेश्वर चव्हाण आणि पथक मुंबईला गेले होते. त्यांनी कागदपत्रांच्या आधारावर औरंगाबाद येथील शेख कादर अली शेख अफजल अली याला नांदेडला आणले. शेख कादर अलीच्या नावावर दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी भरल्याचे संदेश मागील एक महिन्यात आलेले आहेत. मुळात शेख कादर अली हा फेब्रीकेशनचे काम करणारा व्यक्ती आहे. त्याच्याकडे बायोडिझेल खरेदी करण्याचा परवाना पण नाही. आज स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी शेख कादर अलीला १२०० लिटर बायोडिझेल प्रकरणात अटक केली आहे.
बायोडिझेल विक्री करण्याचे, खरेदी करण्याचे अनेक नियम आहेत. पण त्यासाठी जीएसटी कर भरणे अत्यावश्यक बाब आहे. शेख कादर अलीच्या नावाचे जीएसटी क्रमांक वापरून त्यानेच बायोडिझेल विक्री केल्याचा प्रकार या घटनेत समोर आला आहे. शेख कादर अलीच्या जीएसटी क्रमांकावर मागील एका महिन्यात दोन कोटी रुपये जीएसटी कर संदर्भाने संदेश आले आहेत. याचा अर्थ असा होतो की, जीएसटी चोरीचा एक मोठा रॅकेट या बायोडिझेल प्रकरणाशी जोडलेले आहे. १०० लिटर बायोडिझेलचे बिल बनविले जाते. १०० लिटरप्रमाणे जेवढा जीएसटी कर होतो. तेवढा भरला जातो. पण प्रत्यक्षात त्या वाहनामध्ये हजार लिटर बायोडिझेल येते याचा अर्थ ९०० लिटर बायोडिझेलची जीएसटी चोरी होते. एका १२०० लिटरच्या बायोडिझेल प्रकरणात २ कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी कराचे संदर्भ आता जोडले जात आहेत. म्हणजे भारतात बायोडिझेलच्या नावावर आणा इतर वस्तूंवार  किती मोठी जीएसटी कराची चोरी देशात सुरू असेल याचे गणित करणेच अवघड आहे.
           नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने बायोडिझेल १२०० लिटरच पकडले पण त्यामागे असलेले धागेदोरे शोधतांना जीएसटी करामध्ये किती मोठा घोटाळा सुरू आहे. हे बाहेर आणले. बायोडिझेल खरेदी विक्री आणि त्याचे नियंत्रण हा सर्व महसुल विभागाचा प्रकार आहे. तरीपण पोलीसांना प्राप्त असलेल्या अधिकारांनुसार त्यांचा दखल या प्रकरणात आहेच. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांनी शोधलेल्या या जीएसटी घोटाळ्यात काय-काय पुढे येईल हे काही काळानंतर समजेल.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.