नांदेड(प्रतिनिधी)-आज 26 नोव्हेंबर संविधान दिन आणि 26/11 च्या शहीदांना आदरांजली असा दुहेरी कार्यक्रम पोलीस अधिक्षक कार्यालयात पार पडला तेंव्हा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
आज 26 नोव्हेंबर आणि 26/11 च्या हल्यातील शहिदांना आदरांजली असा दुहेरी कार्यक्रम पोलीस अधिक्षक कार्यालयात प्रभारी पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या उपस्थितीत पार पडला तेंव्हा. सर्वप्रथम 26 /11 च्या हल्यात शहीद झालेल्या जवानांची आणि अधिकाऱ्यांची आठवण करत प्रभारी पोलीस अधिक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे, नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक दिरप्पा भुसनुर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्र्वंभर पल्लेवाड आणि शिवाजी लष्करे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदार उपस्थित होते. या प्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाचन द्वारकादास चिखलीकर यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन जनसंपर्क विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे यांनी उत्कृष्ठरित्या केले.
