नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव शहरात एक सराफा दुकान फोडून चोरट्यांनी 3 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शहरातील भाग्यनगर, शिवाजीनगर, वजिराबाद आणि नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 4 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. रामनगर, किनवट येथून शेतातील ग्रिप फिल्टर साहित्य चोरीला गेले आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये मिळून 4 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
शरद नरहरी उदावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 नोव्हेंबरच्या रात्री 1 ते पहाटे 6 दरम्यान त्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे करीत आहेत.
साईनाथ दिगंबर राचेवाड यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.पी.5817 ही 19 नोव्हेंबरच्या रात्री 8 ते 20 नोव्हेंबरच्या पहाटे 8 वाजेदरम्यान सरस्वतीनगर नांदेड येथून चोरून नेली आहे. या गाडीची किंमत 10 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार वच्छेवार अधिक तपास करीत आहेत. नायगाव येथून बळवंतनगरमध्ये उभी असलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.6536 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी 18-19 एप्रिलच्या रात्री चोरीला गेलेली आहे. या बाबतचा गुन्हा नायगाव पोलीसांनी दाखल केला असून पोलीस अंमलदार मुस्तापुरे अधिक तपास करीत आहेत. रामकिशन गोविंदराव आवरते यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.व्ही.2955 ही 25 हजार रुपये किंमतीची गाडी 15 ऑक्टोबरच्या रात्री 10 ते 16 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजेदरम्यान राधाई पॅथॉलॉजी लॅबसमोरून चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत. रामेश्र्वर गोविंद राठोड यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.38 वाय.4462 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी 29 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजता तेहरा ऍटोमोबाईल्ससमोरुन चोरीला गेली आहे. वजिराबाद पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार भिमराव भद्रे अधिक तपास करीत आहेत.
गजानन किशनराव नारलावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 नोव्हेंबर रोजी रामनगर लगत असलेल्या त्यांच्या शेतातील ईलेक्ट्रीक वायर, दहा प्लॅस्टीक छड्या आणि ड्रीप फिल्टर असे एकूण 64 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेत असतांना तेथील शेत मजुराने चोरास का नेतो असे विचारल्यावर त्याला मारहाण करून त्याने हे साहित्य नेले आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक कोलबुध्दे अधिक तपास करीत आहेत.
