क्राईम

व्हॉटसऍप संकेतस्थळांवर घाणेरडे कॉमेंटस्‌ करणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारांनी कोणाचे पितळ उघडे करण्याच्या बातम्या लिहितांना आपल्या कुटूंबाची बदनामी निचस्तरावर जावून केली जाते याचे भान ठेवूनच पत्रकारीता करण्याची गरज आहे. वास्तव न्युज लाईव्ह आणि दैनिक नांदेड चौफेरने मागील चार महिन्यापासून सुरू केलेल्या शेख जाकीर शेख सगीरच्या वास्तव्याला जनतेसमोर मांडण्याच्या प्रक्रियेत शेख जाकीर शेख सगीरने अत्यंत निच पध्दतीने कुटूंबावर आक्षेप घेणारे कॉमेंटस केले. पण विजय सत्याचाच होतो. हे सिध्द झाले आणि पोलीसांनी शेख जाकीर शेख सगीरविरुध्द पत्रकाराच्या लेकरांवर अत्यंत घाणेरडे आणि निच प्रवृत्तीचे शेरे मारणाऱ्या शेख जाकीर विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शेख जाकीर शेख सगीर हा राजा हरीश्चंद्र आहे अशा पध्दतीचे लिखाण केल्यानंतर त्यासंदर्भाने न्यायालयात 20 लाखाचा मानहानी दावा दाखल करण्यात आला. त्याप्रकरणात राजा हरीश्चंद्र लिहिणे ही मानहानी कशी होते.हा प्रश्न सध्या न्यायालयासमोर आहे. त्यानंतर राज्यभर अर्जाचा धंदा अशा आशयाची एक बातमी लिहिल्यानंतर त्या बातमीविरुध्द सुध्दा सहा जणांनी प्रत्येकी 10 लाख रुपये द्यावे अशी आपली किंमत निश्चित करून शेख जाकीर शेख सगीरने दुसरा दिवाणी दावा दाखल केला हा ही प्रश्न सध्या न्यायालयासमक्ष प्रलंबित आहे. या दोन्ही प्रकरणाचा निर्णय न्यायालयात होईल आणि लिहितांना चुकले असेल तर त्याचे फळ लिहिणाऱ्याला भोगावेच लागतील.
त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे मिळालेल्या माहितीनुसार माहिती अधिकार संरक्षण समिती ही बोगस संस्था आहे असे लिखाण करण्यात आले. मागील एका दशकापासून जास्त या बोगस माहिती अधिकार संरक्षण समितीचे कामकाज सुरू आहे. त्याच्यामुळे नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक लोकांविरुध्द माहिती अधिकार अर्ज देण्यात आले. त्यात काय-काय झाले हे अजून लिहायचे आहे. दरम्यान पोलीसांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 397 मध्ये पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले होते की, कोणाला खंडणीसाठी कोणी त्रास दिला असेल, अर्ज बाजारी केली असेल तर त्या बाबत पोलीसांकडे येवून तक्रार द्यावी.याही आवाहनाला छापण्यात आले होते.
वास्तव न्युज लाईव्ह आणि दैनिक नांदेड चौफेरने छापलेल्या बातम्यांचा राग मनात धरुन शेख जाकीर शेख सगीरने अत्यंत निच पध्दतीने व्हॉटसऍप या संकेतस्थळावर स्टेटस ठेवणे, व्हॉटसऍप गु्रपवर अत्यंत घाणेरड्या, न लिहिण्यासारख्या कॉमेंट लिहिणाऱ्याच्या कुटूंबातील व्यक्तीविरुध्द केले. बातमी लिहिणाऱ्याचे काही चुकले असेल तर त्यासाठी कायदेशीर पर्याय आहेत. एखाद्या बातमीसाठी त्या व्यक्तीच्या कुटूंबावर घाणेरड्या शब्दात हल्ला करणे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. झालेल्या प्रकारानंतर एकाने पोलीसांची दारे ठोठावली आणि त्यानंतर पहिला गुन्हा क्रमांक 320/2021 दाखल झाला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 501 आणि तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67 जोडण्यात आले. हा गुन्हा 14 सप्टेंबर 2021 रोजी दाखल झाला. गुन्हा हा 3 वर्षापेक्षा कमी शिक्षेचा असल्याने शेख जाकीर शेख सगीरला पोलीसांनी नोटीस दिली. पुढील कार्यवाही न्यायालयात होईल. त्यानंतर माझे काय वाकडे होते असा भाव मनात आणून शेख जाकीर शेख सगीरने पुन्हा कॉमेंटकरण्याची आपली घाणेरडी वृत्ती सोडली नाही आणि त्यातून काल दि.23 नोव्हेंबर रोजी गुन्हा क्रमांक 422/2021 दाखल करण्यात आला. त्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 354(अ)(4) आणि 501 तसेच भारतीय तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67 जोडण्यात आले आहे.
मदत करणाऱ्याचे करबध्द आभार
आपल्या कौटुंबिक जीवनात विष घोळून सार्वजनिकरित्या कुटूंबातील व्यक्तीची झालेली बदनामी, मानसिक त्रास सहन करून पोलीसांची दारे ठोठावल्यानंतर अत्यंत खमक्या पध्दतीने पोलीसांनी लिखाण करणाऱ्यांना केलेल्या मदतीसाठी पत्रकार पोलीस विभागाचे करबध्द आभार व्यक्त करत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.