नांदेड, (प्रतिनिधी)-नार्कोस्टिक्स कन्ट्रोल ब्युरोने काल नांदेडमध्ये अफू बोंडे (पॉपी स्ट्रॉ) आणि अफीम पकडल्यानंतर तीन जणांना ताब्यात घेतले होते. आज २३ नोव्हेंबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी इंबीसात देशमुख यांनी तीन दिवस एलसीबीच्या कोठडीत पाठविले आहे.
काल दि.२२ नोव्हेंबर रोजी शंकरराव चव्हाण चौक, मालटेकडी परिसरातील एका व्यापारी संकुलात एनसीबी पथकाने धाड टाकली. तेथे त्यांनी १११ किलो वाणिज्य साठा या प्रवर्गात अफू बोंडे ( पॉपी स्ट्रॉ ) १११ किलो अफू बोंडे पकडले. त्यात पावडर सुध्दा आहे. सोबतच एक किलो चारशे ग्रॅम अफू पकडली. याची एकूण किंमत १ लाख ५५ हजार ४९० रुपये आहे. या सोबत एनसीबी पथकाने ग्राईडींग मशिन कौठा भागातून जप्त केली.
याप्रकरणी एनसीबी पथकाने हरदयालसिंघ गुलाबसिंघ कटोदीया (४७), जितेंद्रसिंघ परगनसिंघ भुल्लर, जीवनसिंघ अवतारसिंघ चोपरा (४१) या तिघांना ताब्यात घेतले. आज एनसीबीच्या तपासीक अंमलदाराने या तिघांना न्यायालयात हजर करुन या लोकांनी कसा अफूचा व्यापार केला, त्यांना आर्थिक पाठबळ कुणी दिले, त्यांनी वाहतूक कशी केली यासंदर्भाचा कट कसा रचला याची माहिती घेण्यासाठी तीन दिवसासाठी एनसीबीच्या कोठडीत पाठवावे अशी विनंती न्यायालयाला केली. सरकारी वकील ऍड.मोहंमद राजियोद्दीन यांनी केलेला युक्तीवाद ऐकून न्यायाधीश देशमुख यांनी या तिघांना तीन दिवस अर्थात २६ नोव्हेंबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठविले आहे.