नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्य पदावरून निवृत्ती होणाऱ्या सदस्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाने आपल्यावतीने सात नावे दिले आहेत. आज सभागृह नेतापदी ऍड. महेश कनकदंडे यांची निवड करण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे महानगरपालिकेतील गटनेता स. विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी महापौर नांदेड वाघाळा महानगरपालिका यांना आज सर्वसाधारण दिलेल्या पत्रकानुसार सुनंदा सुभाष पाटील, महेंद्र हिरामण पिंपळे, अब्दुल हाफीज अब्दुल करीम, राजू गोविंदराव काळे, रजिया बेगम बाबु खान, फरहत सुलताना खुर्शीद अन्वर जहागीरदार, सलीमा बेगम खान नुरूल्ला खान या सात सदस्यांची स्थायी समितीतून निवृत्ती होणाऱ्या सदस्यांच्या जागी नियुक्ती करावी असे पत्र दिले आहे. महेश कनकदंडे यांची सभागृह नेतापदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
उपमहापौर मसुद खान यांचा राजीनामा
आजच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर असलेल्या मुसद खान यांनी आपला राजीनामा सादर केला. राजकीयदृष्ट्या ठरलेला कालखंड पुर्ण झाल्यानंतर मसुद खान यांनी आपला राजीनामा सादर केला.