

नांदेड(प्रतिनिधी)- येथील डॉ.आंबेडकरनगर भागात राहणाऱ्या संगीता नामदेव भद्रे यांचे 21 नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले.
संगीता नामदेव भद्रे यांचे काल दि.21 नोव्हेंबर रोजी निधन झाल्यानंतर आज दि.22 नोव्हेंबर रोजी नामदेव भद्रे यांचे मुळ गाव गोदमगाव ता.नायगाव येथे संगीता भद्रे यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत. डॉ.आंबेडकरनगर भागातील अनेक नागरीकांनी गोदमगाव ता.नायगाव येथे जावून त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी गोदमगाव परिसरातील अनेक नागरीकांची उपस्थिती होती.