नांदेड (प्रतिनिधी)- एनसीबी पथकाने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण चौकाजवळ एका व्यापारी संकुलात थापा टाकला असून त्या ठिकाणातून जवळपास 1 क्विंटल वजनाचे अफू बोंडे जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
मागील काही दिवसांपासून एनसीबीचे पथक आमली पदार्थ विरोधात कारवाई करत आहेत. त्यानुसार एनसीबी पथकाने आज माळटेकडी परिसरातील शंकरराव चव्हाण चौकात असलेल्या व्यापारी संकुलात धाड टाकली आहे. या धाडीमध्ये जवळपास एक क्विंटल वजनापचे अफू बोंडे जप्त करण्यात आले आहेत. अफू बोंड्याची विक्री किंमत 7 ते 12 हजार रूपये किलो असते असे सांगण्यात आले. अफू बोंड्याची विक्रीवर प्रतिबंध लागलेला आहे. पण काही विक्रेते जुन्या बनावट परवान्याच्या आधारावर हा अफू बोंडे विक्रीचा व्यवसाय करत असतात.
नांदेड येथील स.प्रितपालसिंघ शाहू यांनी या अफू बोंड्याच्याविक्रीबाबत आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अनेकजागी निवेदने दिली, पण त्यावर काही कार्यवाही झाली नव्हती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) पथकाने आज अफू बोंडे विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई केली आहे. याबाबत नांदेड जिल्हा पोलीस दलाला अद्याप तरी काही माहित नाही, कारण एनसीबी सर्व घटना प्रकार मुंबई येथून सुरू होतो आणि तेथेच तो गुन्हा दाखल होतो, अशी त्यांची कार्यपद्धती आहे.
