नांदेड

रविवारी सापडले दोन नवीन कोरोना रुग्ण ; 28 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत

नांदेड,(प्रतिनिधी) – आज रविवारी 617 तपासणीत दोन कोरोना बाधीत नवीन रुग्ण सापडले आहेत.  आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 28 आहे. कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी 97.03 अशी आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक  21 नोव्हेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज  दोन नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
आज एकाही रुग्णाला उपचारानंतरची सुट्टी मिळालेली नाही. आज  617 अहवालांमध्ये  610 निगेटिव्ह आणि  02 पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 90463  झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत 02 आणि 00 अँटीजेन तपासणीत 00 असे एकूण 02  रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी  अहवाल   प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 05 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 00 आहेत. आज सापडलेले नवीन रुग्ण नांदेड मनपा-02 आहेत.
आज कोरोनाचे 28 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण – 17,नांदेड तालुक्यातील विलगीकरण-02, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-04, खाजगी रुग्णालयात- 05 असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात  02  रुग्ण आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *