नांदेड(प्रतिनिधी)-फटाका व्यापाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पवन बोराच्या घराच्या तपासणीत पिस्तुल आणि 14 रिकामे काडतूस सापडले. यावरून जिल्ह्यात बंदुकीच्या गोळ्यांचे मोजमाप शोधण्याची गरज तयार झाली आहे. जिल्ह्यात किती लोकांकडे परवाना मिळालेल्या असंख्य पिस्तुल असतील पण त्या व्यक्तीने खरेदी केलेल्या गोळ्या आणि वापरलेल्या गोळ्या याचा हिशोब कोण पाहिल हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात फटका व्यापारी धनराज मंत्री यांच्या तक्रारीवरुन पवन बोरासह इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला. त्यात पोलीसांनी पवन बोराला अटक केली. त्याच्या घराच्या झडतीमध्ये त्याच्याकडे असलेले परवाना पिस्तुल सापडले. सोबतच दोन मॅगझीन आणि 14 रिकामे काडतूस सापडले. सध्या पवन बोरा न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात आहे. पण या रिकाम्या 14 गोळ्या पवन बोराने कोठे वापरल्या याचा काही हिशोब मात्र पोलीसांनी त्याला विचारलेला नाही.
प्रश्न पवन बोराकडे 14 रिकाम्या काडतुसांचा नाही तर नांदेड जिल्ह्यात असंख्य लोकांकडे परवाना असलेले पिस्तुल आहेत. अर्थात त्यांच्याकडे काडतुसे पण असतील पिस्तुल खरेदी करतांना त्याची परवागनी जिल्हादंडाधिकारी देतात. सोबतच गोळ्या खरेदी करण्याची परवानगी त्यात असते. या परिस्थितीमध्ये खरेदी केलेले पिस्तुल अनेक वेळेस त्यात-त्या पोलीस ठाण्यात जमा सुध्दा केले जाते. त्यावेळी कांही जण गोळ्या जमा करतात तर कांही जण गोळ्या जमा करत नाहीत असे एका व्यक्तीने सांगितले. मग या गोळ्यांचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी कोणाची.
एखाद्या व्यक्तीकडे सापडलेल्या रिकाम्या काडतुसांची माहिती सुध्दा कोणाला नाही. याचा अर्थ त्याने खरेदी केलेल्या पिस्तुल काडतुसांचा वापर केलेला आहे. पण तो वापर कोठे केला आणि कोणत्या कारणासाठी केला. याचा कांही ताळमेळ दिसत नाही. पवन बोराकडे सापडलेल्या 14 रिकाम्या काडतुसांचा अर्थ लिहायची सुरूवात केली तर अनेक पान अपुरे पडतील.
प्रशासनाच्यावतीने दिली जाणारी पिस्तुलांची व काडतुसांची परवानगी इथपर्यंत ठिक आहे. पण नंतर त्याचा वापर, कारणे आणि गरज कोण शोधणार? असे होणार नसेल तर त्यांना तर खून करून पिस्तुल साफ करून घेणे एवढेच काम उरेल ! त्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणेने जिल्हयातील पिस्तुल धारकांनी खरेदी केलेले काडतुस आणि त्यांचा वापर शोधण्यासाठी सुध्दा एखादी सक्षम यंत्रणा कार्यान्वीत करण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे.
