बोगस समितीची चौकशी कोण करणार?
नांदेड(प्रतिनिधी)-माहिती अधिकार संरक्षण समिती अस्तित्वात नसतांना न्यायालयाच्या आदेशाने नायगाव पोलीसांनी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. माहिती अधिकार संरक्षण समिती बोगस असतांना सुध्दा त्या समितीच्या अर्जावर कार्यवाही होते यापेक्षा या लोकशाहीचे दुर्देव दुसरे काय.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे नायगाव येथे 18 नोव्हेंबर रोजी गुन्हा क्रमांक 215/2021 दाखल झाला आहे. या अर्जातील फिर्यादीचे नाव शेख जाकीर पिता शेख सगीर (वय 33) धंदा संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य रा.बरकतपुरा ता.अर्धापूर जि.नांदेड हा आहे. या माणसाने पंचायत समिती कार्यालयातील एम.एस.चव्हाण तत्कालीन गटविकास अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक एम.डी.ठाकूर, कनिष्ठ लेखाधिकारी आर.ई.तोडरमल, वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी एस.जी.वरखंडे आणि इतर सर्व जबाबदार व्यक्ती यांच्याविरुध्द हा अर्ज दिला आहे. या अर्जातील माहितीनुसार सन 2016 ते 2021 दरम्यान या सर्व लोकांनी 4 लाख 74 हजार रुपयांचा निधी वैयक्ती हेतूसाठी उचल करून अपहार केला आहे. हा निधी त्या भागातील शाळांवर ग्रामपंचायतीमार्फत खर्च होणे आवश्यक होते असा या तक्रारीचा मजकुर आहे.
शेख जाकीर शेख सगीर याचा मित्र दत्तात्रय पांडूरंग अनंतवार आणि सेवक पवन जगदीश बोरा हे सर्व व्यक्ती चांगलेच मित्र आहेत. एक दुसऱ्याच्या सहमतीशिवाय काहीच करत नाहीत. सध्या पवन बोरा हा तुरूंगात आहे.दत्तात्रय अनंतवार फरार आहे. यांनी सुरू केलेला धंदा प्रसार माध्यमांनी मांडल्यानंतर त्या मांडणीकरणाऱ्यांविरुध्द आपल्या व्हॉटसऍप स्टेटसवर अत्यंत निच आणि घारणेरड्या स्टेटस प्रसारीत करून शेख जाकीर शेख सगीरने मी नांदेड जिल्ह्याचा दाऊद इब्राहीम असल्यासारखे प्रदर्शन केले. प्रत्यक्षात त्याचे स्टेटस वाचणाऱ्यांनी त्याच्यावरच थुंकलेले आहे हे सत्य आहे. दुर्देव या लोकशाहीचे माहिती अधिकार संरक्षण समिती ही न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीच नसतांना त्या नावाचा वापर करून गेली अनेक वर्ष शेख जाकीर शेख सगीरचा धंदा सुरू आहे. आज पोलीसांनी दिलेल्या माहितीत सुध्दा त्याचा हाच धंदा दाखवलेला आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी जन माहिती सेवा समिती या नावाचे नवीन लेटर पॅड तयार करून त्याने जिल्हाधिकारी नांदेडला दिलेला एक अर्ज आहे. त्यानुसार त्यानेच आपल्या शब्दात आपली माहिती अधिकार संरक्षण समिती बोगस असल्याचे सांगितले आहे. तरीपण त्यावर कोणीच कार्यवाही केली नाही.
प्रशासनातील कांही अधिकाऱ्यांना त्याने दिलेल्या अर्जावर विद्युत प्रवाहाने पृष्ठांकन करून तो अर्ज पुढे पाठविण्याची ऐवढी घाई असते की, पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्या स्वत:च्या स्टेटसचे भान नसते. त्यात कांही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नांदेड चौफेरचे संपादक मोहम्मद आरेफ खान पठाण आणि वास्तव न्युज लाईव्हच्या प्रतिनिधीविरुध्द शेख जाकीर शेख सगीरने आपल्या बोगसपणाने उठवलेले राण आता त्याच्याविरुध्दच आग पकडण्याच्या तयारीत आहे. या परिस्थितीत सुध्दा त्याच्या बोगस समितीच्या नावावर गुन्हे दाखल होत आहेत या पेक्षा या लोकशाहीचे दुर्देव काय असेल. कांही दिवसांपुर्वीच नरसी नायगाव मध्ये सुध्दा एका घोबरेल तेलाच्या दुकानात जाऊन तपासणी केल्याचे विश्र्वसनिय वृत्त आहे. त्यानंतर तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे जावून या प्रकरणात मांडवली करण्यात आली असे लोक सांगतात. अनंतवारविरुध्द तीन गुन्हे दाखल झाले. मागील कांही गुन्ह्याचा अभिलेख आहे. शेख जाकीरने आपल्या न्यायालयीन निवेदनात आपली अशी कोणतीच समिती नसल्याचे मान्य केले आहे. तरीपण त्या बोगस समितीच्या नावावर हा सर्व धंदा सुरु आहे. या माणसाकडे मागील अनेक वर्षापासून एक पोलीस सुरक्षा रक्षक का आहे याचा शोध तरी पोलीसांनी घेण्याची गरज आहे. पण ज्या पोलीसांना शेख जाकीरचा कारभार चालवावा असे वाटत असेल ते अधिकारी ही तपासणी कशाला करतील आणि अशाच पध्दतीमुळे अशा लोकांना वाव मिळतो आणि ते आपले घर भरतात.
पोलीस विभागाने आता जनतेला आवाहन करून तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे. त्यानुसार ज्या कोणाला ज्या कोणी लोकांनी गंडवले असेल त्या सर्वांविरुध्द जनतेने तक्रार द्यावी अशी विनंती दैनिक नांदेड चौफर आणि वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने करण्यात येत आहे.
