नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
आज 19 नोव्हेंबर माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म दिन. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यालयाचे पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, राखीव पोलीस उपनिरिक्षक काशिनाथ बोरकर यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित होते. यानंतर पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ वाचन केली. त्यांच्यासोबत सर्वच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या शपथेला प्रतिसाद दिला. जनसंपर्क कार्यालयाचे सहायक पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार विनोद भंडारे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
