क्राईम

स्थानिक गुन्हा शाखेला कांही गुन्हेगार शोधण्यात का रस नसेल ?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात वेगवेगळ्या कारणांनी दहशत माजवून सर्वसामान्य नागरीकांना त्रासदायक ठरलेल्या अनेक आरोपींना पकडण्यात नांदेडची स्थानिक गुन्हे शाखा नेहमीच प्रथम क्रमांकावर राहिली. पण कांही विशेष गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा का मागे राहिली हे शोधण्यासाठी एखाद्या विद्यावास्पतीची नियुक्ती करावी लागेल.
नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेत 23 महिन्यापुर्वी पोलीस निरिक्षक या पदावर कार्यरत झालेले द्वारकादास चिखलीकर यांनी कोठेही जात असतांना त्यांना प्रकाशाची कधीच गरज पडली नाही. त्यांनी आपला प्रकाश स्वयंम निर्माण केला आणि काही सुर्याजी पिसाळ नांदेडच्या सिंहासनाला धक्का देण्याच्या तयारी असतांना सिंहासनाचे पाय मजबुत ठेवण्यात द्वारकादास चिखलीकर यांनी केलेली कामगिरी नक्कीच दखल योग्य आहे. कोणताही कडा आणि दरी पार करतांना त्यांनी कोणाचीच मदत मागितली नाही. नांदेड जिल्ह्यातील 36 पोलीस ठाण्यांमध्ये घडलेल्या अनेक गुन्ह्यांसाठी त्यांनी अनेकदा हजारो किलो मिटर प्रवास करून त्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले आणि आपल्या विरोधकांच्या तोंडाला कुलूप लावले.
पण मागील कांही दिवसांपासून घडलेल्या कांही गुन्ह्यांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेने एकही गुन्हेगार पकडण्यासाठी मेहनत घेतलेली दिसत नाही. ज्यामध्ये वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्रमांक 397 सुध्दा आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर उद्या दि.17 नोव्हेंबर रोजी सुनावणी सुनिश्चित आहे. तरीपण या आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचा रस दिसत नाही. कांही दिवसांपुर्वी एक जुगार अड्डा लुटल्यागेला होता. त्याप्रकरणी जुगार अड्‌ड्याच्या बाहेर मला व्यक्तीगत लुटल्याची एक तक्रार दाखल झाली होती. तो गुन्हा कोणी घडवला हे सर्व स्थानिक गुन्हा शाखेला माहित असेलच? मग नांदेड जिल्हा पोलीस दलातील सुर्याजी पिसाळाने आपला एखादा हितचिंतक स्थानिक गुन्हा शाखेत पेरला आहे काय ? हा संशोधन विषय आहे.सध्या 12 नोव्हेंबरच्या घटनेनंतर पोलीसांची जबाबदारी एक वेगळ्या पध्दतीने वाढलेली आहे. त्यामुळे व्यक्तीगत तक्रारीनंतर झालेल्या गुन्हेगारांना शोधण्यात तेवढा रस स्थानिक गुन्हा शाखेला बहुदा नसेल. सुर्याजी पिसाळासोबत युती झाली असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एखाद्या विद्यावास्पतीची नियुक्ती पोलीस अधिक्षकांनी करावी अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.