नांदेड

बुधवारी सापडले चार नवीन कोरोना रुग्ण;तिघांची सुट्टी

नांदेड,(प्रतिनिधी) – आज बुधवारी ७२१ तपासणीत चार कोरोना बाधीत नवीन रुग्ण सापडले आहेत.  आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २३ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज चार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
मनपा विलगिकरण-०२ आणि सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथून ०१,अश्या ०३ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७७७३ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
आज ७२१ अहवालांमध्ये ७०९ निगेटिव्ह आणि ०४ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०४४९ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०४ आणि  अँटीजेन तपासणीत ०० असे एकूण ०४ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी  अहवाल  ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०८ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत. आज सापडलेले नवीन रुग्ण नांदेड मनपा-०२,कंधार-०२, आहेत.
आज कोरोनाचे २३ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१३,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०५, खाजगी रुग्णालयात- ०३ ,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात  ०२ रुग्ण आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *