नांदेड

पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख विरुध्द अर्ज दिल्यामुळे माझे नाव गुन्ह्यात गोवले

दत्तात्रय अनंतवारचा न्यायालयासमोर मांडलेला अर्ज
नांदेड(प्रतिनिधी)-शहर उपविभागातील पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन जगदेवराव देशमुख यांच्याविरुध्द दिलेल्या अर्जामुळे मला गुन्ह्यात गोवण्यात आले असे शब्द आपल्या अटकपुर्व जामीन अर्जात माहिती अधिकार कार्यकर्ता दत्तात्रय पांडूरंग अनंतवार यांनी लिहिले आहे. आज या प्रकरणात पोलीसांनी अर्ज दिल्यामुळे सुनावणीची तारीख वाढली आहे.
3 नोव्हेंबर रोजी धनराज बद्रीनारायण मंत्री यांच्या अर्जावरून पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा, दत्तात्रय पांडूरंग अनंतवार, गौतम जैन या तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 397/2021 दाखल झाला. या गुन्ह्यात पवन जगदीश बोरा उर्फ शर्माला अटक झाली आहे. पोलीस कोठडीत असतांना पोलीसांनी त्याच्याकडून पिस्तुल व काडतुसे जप्त केली आहेत. इतर दोघे अर्थात दत्तात्रय पांडूरंग अनंतवारने अटकपुर्व जामीन अर्ज क्रमांक 893/2021 आणि गौतम जैनने अर्ज क्रमांक 899/2021 दाखल करून अटकपुर्व जामीन मागितला आहे. न्यायालयात अर्ज दाखल झाल्यानंतर आज या प्रकरणात पोलीसांनी आपले म्हणणे (से) दाखल करायचा होता. पण आज शहरात पोलीस बंदोबस्त असल्यामुळे या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी तारीख वाढवून मिळण्यासाठी अर्ज दिला आहे. त्यानुसार तारीख वाढविण्यात आली आहे.
दत्तात्रय पांडूरंग अनंतवारने दाखल केलेल्या अर्ज क्रमंाक 893 मध्ये असे लिहिले आहे की, मी अर्ज दिला आहे. कारण मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे आणि मला सुरक्षा सुध्दा आहे. पण बंदुक दाखवणे, धमकी देणे हा प्रकार पवन शर्माशी संबंध आहे माझा त्या घटनेशी कांही संबंध नाही. सोबतच अर्जात असे लिहिले आहे की, मी 5 जून 2021 रोजी शहर उपविभागातील पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन जगदेवराव देशमुख विरुध्द मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणास बसणार होतो. कारण त्यांच्याविरुध्द न्यायालयात गंभीर गुन्ह्यांचे व फौजदारी खटले सुरू असल्यामुळे त्यांची नांदेडची नियुक्ती रद्द करण्यासाठी हे उपोषण होते. चंद्रसेन देशमुख हे वजिराबाद पोलीस ठाण्याचे प्रशासनिक अधिकारी असल्याने माझे नाव गुन्हा क्रमांक 397 मध्ये गोवून बदला घेण्यात आला आहे असे लिहिले आहे. पण आपल्या अर्जात दत्तात्रय अनंतवार यांनी आझाद मैदानावरील 7 जूनचे उपोषण आपण तुरत स्थगित करीत असल्याचे पत्र 6 जून 2021 रोजी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे आझाद मैदान, मुंबई यांना पाठवल्याची बाब न्यायालयातील अर्ज क्रमांक 893 मध्ये लिहिलेली नाही.
आज शहरात पोलीस विभाग बंदोबस्तात व्यस्थ असल्यामुळे या अर्ज क्रमांक 893 आणि अर्ज क्रमांक 899 ची पुढील सुनावणी वाढली आहे. या सुनावणीसाठी कोणती तारीख निश्चित झाली हे वृत्तलिहिपर्यंत समजले नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.