नांदेड(प्रतिनिधी)-माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कोणा-कोणाविरुध्द अर्ज दिले आहेत. त्या सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांना गुन्हा क्रमांक 397 चे तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी पत्र पाठवून माहिती मागवली आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, यांनी सुध्दा पुर्वीच जनतेला आवाहन केले आहे की, या प्रकरणातील तीन लोकांनी कोणा-कोणाला अर्जांच्या संदर्भाने धमकी दिली असेल, खंडणी मागितली असेल त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी. पोलीसांनी केलेल्या या आवाहनानंतर तरी शासकीय अधिकारी, व्यापारी, शासकीय कर्मचारी आणि इतर कोणीही असे झाले असेल तर पोलीसांशी संपर्क साधावा अशी अपेक्षा आहे.
नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 397/2021 दाखल झाल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी जनतेतील लोकांना आवाहन केले होते की, या प्रकरणातील तिघे अर्थात पवन जगदीश बोरा, दत्तात्रय पांडूरंग अनंतवार आणि गौतम जैन यांनी कोणाकडून खंडणी मागितली असेल, कांही त्रास दिला असेल तर त्याबाबत वजिराबाद पोलीसांना माहिती द्यावी असे सांगितले होते.
या प्रकरणाची प्रेसनोट काढतांना वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी या तिघांविरुध्द मागे नोंदवलेल्या गुन्ह्याचे क्रमांक लिहुन त्यांची प्रवृत्ती जनतेसमोर आणली होती आणि त्यांनी सुध्दा जनतेला या तिघांकडून कांही धमकी देणे, खंडणी मागणे असे प्रकार घडले असतील तर माहिती देण्याचे आवाहन केले होते. पोलीस अधिक्षक कार्यालयाने सुध्दा अशी प्रेसनोट जारी केली होती.
पोलीसांनी जाहिरपणे हे आवाहन केले आहे तेंव्हा जनतेतील कोणीही व्यक्ती जसे शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, व्यापारी व इतर यांच्यासोबत या त्रिदेवांनी केलेले कांही चुकीचे काम असेल तर प्रत्येकाने त्याची माहिती पोलीसांना दिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
