क्राईम

12 नोव्हेंबरच्या घटनेत 46 जण पोलीसांच्या ताब्यात; त्यातील 23 जण पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-12 नोव्हेंबर रोजीच्या घटनेत पोलीसांनी आजपर्यंत 46 लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यातील 23 जणांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 12 नोव्हेंबरच्या घटनेसंदर्भाने पोलीसांनी समाजात अशांतता माजविणाऱ्यांविरुध्द कडक कार्यवाही करून दाखवली आहे.
12 नोव्हेंबर रोजी नांदेड शहरात अनेक ठिकाणी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलीस विभागातील शहरातील चार पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल केले. आजपर्यंत त्या दिवशीच्या प्रकरणात एकूण 46 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणि त्यातही देगलूर नाका परिसरात पोलीसांवर झालेल्या हल्ला प्रकरणात जवळपास 30 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील शेख जबुरे शेख सादीक, नईम आजम खान, शेख युसूफ शेख युनूस, सय्यद अशफाक सय्यद मुसा, शेख सलमान शेख अब्दुल जब्बार, शेख जमीर शेख जलील, शेख अलीम शेख खलीम, नोमान खान, सलमान खान, शेख अरबाज, सय्यद आदम, शेख एजाज, शेख आरेफ, जहीर बेग, समीर, सय्यद नदीम, नुर मोहम्मद, आरबाज पठाण, सय्यद कलीम, फेरोज खान, शेख रमजान, शेख मुस्ताक, शेख मुजम्मील आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्त्येपोड यांनी न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी यातील 23 जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अपर पोलीस महासंचालक नांदेडमध्ये
अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था विभागाचे राजेंद्रसिंह हे आज नांदेडमध्ये पोहचले आहेत. 12 नोव्हेंबरच्या घटनेत काय-काय घडले आणि कसे घडले. याचा ते अभ्यास करणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेसंदर्भाने पोलीसांनी उचलेले कडक पाऊल प्रशंसनिय आहे. आपण केलेली कार्यवाही जनतेसमोर सादर करून पोलीसांनी उद्या दि.16 नोव्हेंबर रोजी प्रस्तावित असलेला या घटनेविरोधातील मोर्चा रद्द करून घेण्यात जवळपास यश मिळवले आहे. उद्या अपर पोलीस महासंचालक नांदेडमध्येच असतील आणि या सर्व घटनाक्रमाचा ते बारकाईने अभ्यास करतील आणि आपल्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतील. घडलेला प्रकार नक्कीच दुर्देवी आहे आणि समाजात अशांतता पसरविणाऱ्याविरुध्द कडक कार्यवाही होणे अपेक्षीतच आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.