क्राईम

घटस्फोटीत पत्नीचा खून करणाऱ्याला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-शनिवारी सायंकाळी कलालगल्ली भागातील बब्बुजान मस्जिदजवळ आपल्या घटस्फोटीत पत्नीच्या मानेत स्कु्रड्रायव्हर खुपसून तिचा खून करणाऱ्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी  तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
जुन्या नांदेड भागातील कल्लाल गल्ली येथे माहेर असलेल्या अनुराधा संजय कस्तुरकर (20) चे लग्न सौरभ रमेश जाधव (23) रा.होळी याच्यासोबत झाले होते. एक दुसऱ्यावर प्रेम असलेल्या दोघांनी आपसात समन्वय साधून विवाह केला. विवाहनंतर जीवनात बदलणाऱ्या परिस्थितीत यांचे एक दुसऱ्याशी बिनसले आणि यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर सुध्दा अनुराधाने माझ्या संपर्कात राहावे अशी अपेक्षा सौरभ जाधवची होती. दि.13 नोव्हेंबरच्या सायंकाळी अनुराधा आपल्या आई-वडीलांच्या घरी असतांना सौरभ त्या ठिकाणी आला आणि आता सौरभ आपल्याला मारहाण करेल अशी शंका अनुराधाला आली आणि अनुराधा घराबाहेर पळाली. सौरभने तिच्या मागे पळत जावून बब्बुजान मस्जिदजवळ तिच्या मानेत स्कु्रड्रायव्हर खुपसला तो मानेच्या दुसऱ्या भागातून बाहेर आला.
इतवारा पोलीसांनी सुनिता संजय कस्तुरकर यांच्या तक्रारीवरुन सौरभ रमेश जाधव विरुध्द गुन्हा क्रमांक 288/2021 कलम 302, 504, 506 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एम.जे. बेग, पोलीस अंमलदार गौतम कांबळे, शिंदे आणि गोविंद पवार यांनी आज दि.15 नोव्हेंबर रोजी सौरभ रमेश जाधवला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश प्रविण कुलकर्णी त्यास तीन  दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *