

नांदेड(प्रतिनिधी)-त्रिपुरा घटनेचा निषेध करतांना झालेल्या नांदेडमधील हिंसाचारसंदर्भाने शिवाजीनगर पोलीसांनी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.
12 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुसूमताई चौक ते जनता मार्केट या भागात समाजकंटकांनी छपनभोग मिठाईचे दुकान फोडले. गुरूकृपा ट्रेडर्स या दुकानात नुकसान केले. एक चारचाकी महागडी गाडी फोडली, शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोरील लाईट फोडले या घटनांबाबत पोलीस अंमलदार मधुकर आवातीरक यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 440/2021 दाखल झाला. यामध्ये भारतीय दंडसंहितेची कलमे, मुंबई पोलीस कायद्याची कलमे आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रोपीकरण या कायद्याची कलमे जोडण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांच्याकडे देण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी शेख युसूफ शेख युनूस (29), नयुम आजम कुरेशी (38) आणि सय्यद अशफाख सय्यद मुसा (21) या तिघांसह एकूण 4 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना लवकरच गजाआड करू असे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी सांगितले.