नांदेड(प्रतिनिधी)-महिंद्रा रुरल हॉऊसींग फायनान्सच्या वसुली अधिकाऱ्याला मारहाण करून लुट करणाऱ्या तिघांना भोकर पोलीसांनी अटक केली आहे.
विठ्ठल रामचंद्र मेकेवार हे महिंद्रा रुरल हाऊसींग फायनान्समध्ये काम करतात. मौजे बेंबर ता.भोकर येथील एका वसुलीसाठी विठ्ठल मेकेवार दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास गेले असतांना त्यांच्या सोबत त्यांचा मित्र संतोष तोटेवाड पण होता. तुम्ही काकाला नेहमी त्रास देतात असे सांगून साईनाथ बालाजी भोसले, दिगंबर बालाजी भोसले, राजू गोविंद भोसले या तिघांनी विठ्ठल मेकेवारला मारहाण करून खाली पाडले आणि त्यांच्या खिशातील 8 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आहेत अशी तक्रार मेकेवार यांनी दिल्यावर भोकर पोलीसांनी गुन्हा क्रमंाक 419/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक राणी भोंडवे अधिक तपास करीत आहे.
