क्राईम

फटाका व्यापाऱ्याला ‘ठोक दुंगा’ म्हणणारा पवन बोरा पोलीसांच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-फटका विक्रेत्याला पिस्तुल दाखवून ‘ठोक दुंगा’ म्हणणारा पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा सध्या वजिराबाद पोलीस ठाण्यात बसलेला आहे. 3 नोव्हेंबर पुर्वी पोलीस ठाण्यात आल्या बरोबर थेट पीआयच्या कक्षात जाणाऱ्या पवन बोराला आज वजिराबाद पोलीस ठाण्यातील उजवीकडच्या हॉलमधील खुर्चीवर बसावे लागले. याप्रकरणातील ईतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सोबतच या प्रकरणाची सुरूवात कोणी अर्ज आणून केली. याचाही शोध होण्याची आवश्यकता आहे.
28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकाराचे राज्यातील सर्वात मोठे व्यक्ती दत्तात्रय पांडूरंग अनंतवारने फटाका व्यावसायीक मंडळी चिन देशाचे आणि बोगस फटाके विक्री करत आहेत असा अर्ज दिला. या अर्जावर नांदेडचे अत्यंत ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी त्वरीत दखल घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की, पोलीस ठाणे वजिराबाद अत्यंत द्रुतगतीने कामाला लागले. 29 ऑक्टोबर रोजी वजिराबादचे पोलीस अधिकारी अर्जदार दतात्रय पांडूरंग अनंतवार, पवन जगदीश बोरा ही सर्व मंडळी फटाका दुकानात पोहचली. त्यावेळी पवन जगदीश बोराने फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धनराज बद्रीनारायण मंत्री यांना पिस्तुल दाखवून तुझे ठोक दुंगा असे सांगितले. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी धनराज बद्रीनारायण मंत्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दत्तात्रय पांडूरंग अनंतवार, पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा आणि गौतम नरसिंगदास हिरावत उर्फ गौतम जैन या तिघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 , 384, 506, 586, 452, 114, 504, 506 आणि भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3/25 आणि 30 नुसार दाखल केला.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी माहिती अधिकार कायद्याचा गैर फायदा घेणाऱ्या या तिघांच्या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतले आणि या गुन्ह्याचा तपास जलदगतीने व्हावा म्हणून तपास करण्याची जबाबदारी शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्याकडे दिली. रवि वाहुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आरोपींना शोधण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. दरम्यान हिंगोली शहरात एका व्यापाऱ्याला गंडविण्याचा प्रयत्न करणारा पवन जगदीश बोराला हिंगोली पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सुध्दा सोडून देण्यात आले होते. त्यावेळी दुसऱ्या दिवशी अर्थात 7 नोव्हेंबर रोजी पवन जगदीश बोरा अंर्तवस्त्रांवर हिंगोली शहरात फिरतांना अनेकांनी पाहिला होता.
आज अचानकच सुर्य पश्चिमेकडून उगवला आणि पवन जगदीश बोरा जो इतरांना गजाआड टाकण्याचा बोलत होता. तो वजिराबाद पोलीस ठाण्याच्या सर्वसामान्य कक्षात बसलेला फोटो व्हायरल झाला. त्यानंतर त्याबाबत वजिराबादचे प्रभारी पोलीस निरिक्षक हनमंत गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता पवन जगदीश बोरा हा गुन्हा क्रमांक 397 मधील आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. या प्रकरणातील इतर दोन दत्तात्रय अनंतवार आणि गौतम जैन यांना शोधण्याची जबाबदारी पोलीसांकडे शिल्लक आहे. दि.28 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाणे वजिराबादमध्ये दत्तात्रय अनंतवारचा अर्ज घेेवून कोण आले होते याची तपासणी वजिराबाद पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये शोध घेवून केली तर एक नवीनच सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.